गडकरींविषयी अपशब्द : जयहरीसिंग ठाकूर, अभय तिडके भाजपातून निलंबित

जयहरीसिंग संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष तर अभय तिडके सदस्य होते. दोघांचीही या समितीतूनही हकालपट्टी करण्याची सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे करण्यात आली आहे. भाजपचे शहराध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे यांनी दोघांना पक्षविरोधी कारवाया आणि वरिष्ठ नेत्यांबाबत अपशब्द वापरल्याने निलंबित करण्याची घोषणा केली आहे.
गडकरींविषयी अपशब्द : जयहरीसिंग ठाकूर, अभय तिडके भाजपातून निलंबित

नागपूर : लोकसभा निवडणूक आटोपताच भाजपने पक्षाअंतर्गत सफाई अभियानास प्रारंभ केला आहे. निवडणुकीदरम्यान भाजप आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याबाबत अपशब्दांचा वापर करणाऱ्या जयहरीसिंग ठाकूर आणि अभय तिडके यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे.

जयहरीसिंग संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष तर अभय तिडके सदस्य होते. दोघांचीही या समितीतूनही हकालपट्टी करण्याची सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे करण्यात आली आहे. भाजपचे शहराध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे यांनी दोघांना पक्षविरोधी कारवाया आणि वरिष्ठ नेत्यांबाबत अपशब्द वापरल्याने निलंबित करण्याची घोषणा केली आहे. दोघांचे निलंबन सहा वर्षे राहणार आहे. दोन्ही कार्यकर्ते पश्‍चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील आहेत.

आपण भाजप आणि गडकरी यांच्या विरोधात आपण एकही अपशब्द काढला नाही. तिडके याने पटोले यांना मतदान करण्याचे एसएमएस पाठवले होते. प्रत्युत्तरात आपण त्यास नकार दिला होता. त्याचा पिच्छा सोडवण्यासाठी आपण फक्‍त ठिक आहे एवढेच उत्तर दिले. संदेशाचे सर्व फुटेज आपल्याकडे उपलब्ध आहे. आपल्याला बळीचा बकरा बनवण्यात आला. मी भाजपचा प्रामाणिक कार्यकर्ता असून भविष्यातही राहू -जयहरीसिंग

दक्षिणच्या क्‍लिपचे काय?
लोकसभेच्या प्रचारादरम्यान दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची एक वादग्रस्त क्‍लिप व्हायरल झाली होती. यावरून भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आपसात राडाही झाला होता. प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत पोचले होते. बदनामी टाळण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी प्रकरणावर पडदा टाकला होता. मात्र, ही क्‍लिप कोणीतरी नितीन गडकरी यांच्यापर्यंत पोहोचविली होती. या क्‍लिपबाबत शहराध्यक्ष काय भूमिका घेतात याकडे आता बाकीच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com