Two suicides in Beed district for Maratha reservation | Sarkarnama

मराठा आरक्षणासाठी बीड जिल्ह्यात दोघांची आत्महत्या

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

बीड : "मराठा समाजासाठी आपण आपले जिवन संपवित आहोत, मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यावे, समाजाचा अंत पाहू नये ' असा मजकूर लिहून एकाने आपली जीवनयात्रा संपविली. तर दुसरीकडे आरक्षणासठी व मुलीचे लग्न आणि शिक्षणाच्या खर्चामुळे आत्महत्येची दुसरी घटना घडली. 

तालुक्‍यातील बेडुकवाडी शिवारात शनिवारी सकाळी शिवाजी शिवाजी तुकाराम काटे (वय 42) यांचा गळफास लावलेला मृतदेह आढळून आला. "मराठा समाजासाठी आपण आपले जीवन संपवित आहोत, मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यावे, समाजाचा अंत पाहू नये ' असा मजकूर लिहलेली चिठ्ठी त्यांच्या खिशात आढळली. दुसरी घटना डोंगरकिन्ही (ता. पाटोदा) येथे घडली. कानिफ दत्तात्रय येवले (वय 45) यांनी विष प्राशन करुन आत्महत्या केली. 

मराठा समाजाच्या आरक्षणासह मुलीचे लग्न आणि मुलांच्या शिक्षणाच्या चिंतेने विष घेतल्याचे आपल्याला कानिफ यांनी सांगीतले असा जबाब त्यांचे बंधू कल्याण येवले यांनी पोलिसांना दिला. जिल्हा रुग्णालयात मृतदेह असून कुटूंबियांना भरीव मदत आणि एकाला नोकरीत सामावून घेतल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख