राष्ट्रवादीच्या भोसरीतील दोन मातब्बरांना थेट मातोश्रीवरून ऑफर ! 

shivsena-ncp-symbol-f.jpg
shivsena-ncp-symbol-f.jpg

पिंपरी : दोन्ही कॉंग्रेसमधील आऊटगोईंग व भाजप,शिवसेनेतील इनकमिंगचे राज्यभरातील लोण आता पिंपरी-चिंचवडच्या वेशीपर्यंत येऊन ठेपले आहे. भोसरीत राष्ट्रवादीकडून विधानसभेला इच्छूक असलेल्या दोन मातब्बरांना थेट मातोश्रीहून ऑफर आली आहे.

त्याबाबत तूर्त वेट ऍन्ड वॉचचा पवित्रा या दोघांनी घेतला आहे.मात्र, युती झाली नाही,तर निश्‍चीत त्यातील एकजण शिवसेनेच्या गळाला लागण्याची दाट शक्‍यता आहे. 

तूर्त मोठे पक्षांतर पिंपरी-चिंचवडमध्ये झालेले नाही.मात्र,विधानसभेच्या तोंडावर ते होण्याचे संकेत मिळत आहेत.त्यातही शहरातील तीनपैकी भोसरी मतदारसंघात हे आऊटगोईंग आणि इनकमिंग होण्याचा दाट संभव आहे.

कारण तेथील दोघा राष्ट्रवादीच्या इच्छूकांना शिवसेनेची ऑफर आली असल्याला या दोघांच्याही जवळच्या कार्यकर्त्याने रविवारी दुजोरा दिला. 

या दोघांपैकी कुणीही आले,तरी भोसरीचे सीट लागू शकते,असा विश्वास शिवसेनेला वाटतो आहे. त्यातूनच युती झाली,तर ही जागा मागण्यावर शिवसेना ठाम राहण्याची शक्‍यता आहे.

तशी भावना उपनेतेपदी निवड झालेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव -पाटील व विधान परिषदेच्या उपसभापती झाल्याने डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सत्कार सोहळ्यातही शिवसेना कार्यकर्त्यांनी नुकतीच व्यक्त केली आहे. 

त्यामुळेच या मातब्बरांना प्रवेशाबरोबर उमेदवारीची ऑफर शिवसेनेने दिली आहे. मात्र,गणेशोत्सव होईपर्यंत शांत राहणार असल्याचे ही ऑफर मिळालेल्या राष्ट्रवादीच्या एका मातब्बराच्या अतिशय जवळच्या कार्यकर्त्याने सांगितले.

तर, पक्षाने तिकिट दिले नाही व दुसरीकडे युती झाली नाही,तर ही ऑफर नक्की स्वीकारू, असे ती मिळालेल्या दुसऱ्या राष्ट्रवादी इच्छूकाच्या गोटातून सांगण्यात आले. त्यामुळे युती झाली नाही,तर राष्ट्रवादीतील आऊटगोईंगचे लोण भोसरीपर्यंत येणार हे नक्की झाले आहे. 

दरम्यान,भोसरीत भाजपकडून जवळपास उमेदवारी नक्की असलेले विद्यमान आमदार महेशदादा लांडगे यांना सुद्धा शिवसेनेने मातोश्री भेटीचे आवतण अगोदरच दिलेले आहे.मात्र, त्यांनी ते स्वीकारलेले नाही.

ते स्वीकारण्याची शक्‍यताही दिसत नाही. त्यामुळेच राष्ट्रवादीच्या मातब्बरांना आता गळाला लावण्याचे शिवसेनेने ठरविले असावे, असा राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्यात युती झाली नाही वा ही युती होऊन भोसरीची जागा शिवसेनेला मिळाली,तर दोघांपैकी एकजण निश्‍चीत या गळाला लागेल,असे संकेत मिळत आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com