'राष्ट्रवादी'च्या जळगाव जिल्हाध्यक्षपदासाठी संतोष चौधरी, ज्ञानेश्‍वर महाजनांच्या नावाची चर्चा 

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदाचा अॅड.रविंद्र पाटील यांनी राजीनामा दिला आहे. पक्षातर्फे यावेळी मराठा समाजातील अध्यक्ष न देता इतर समाजाचा देण्याचा विचार सुरू असून माजी आमदार संतोष चौधरी, धरणगावचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्‍वर माळी यांच्या नावाचा विचार सुरू असल्याचे वृत्त आहे.
'राष्ट्रवादी'च्या जळगाव जिल्हाध्यक्षपदासाठी संतोष चौधरी, ज्ञानेश्‍वर महाजनांच्या नावाची चर्चा 

जळगाव : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदाचा अॅड.रविंद्र पाटील यांनी राजीनामा दिला आहे. पक्षातर्फे यावेळी मराठा समाजातील अध्यक्ष न देता इतर समाजाचा देण्याचा विचार सुरू असून माजी आमदार संतोष चौधरी, धरणगावचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्‍वर माळी यांच्या नावाचा विचार सुरू असल्याचे वृत्त आहे. 

लोकसभा निवडणूकीत जळगाव लोकसभा मतदारा संघातील पक्षाचे उमदेवार गुलाबराव देवकर यांचा पराभव झाल्यानंतर जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्र पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षाकडे सूपूर्द केला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अद्याप तो मंजूर केलेला नाही. मात्र पक्षातर्फे नवीन अध्यक्षाचे नाव निश्‍चित झाल्यानंतरच त्याचा राजीनामा स्विकृत केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पक्षात मराठा समाजाव्यतिरिक्त यावेळी इतर समाजाला अध्यक्षपदाची संधी देण्यावर चर्चा सुरू आहे. 

पक्षाच्या मुंबई येथे झालेल्या बैठकित याबाबत चर्चा करण्यात आली होती. त्यावेळी एकमताने इतर समाजाचा जिल्हाध्यक्ष असावा असा निर्णय झाला असे सांगण्यात येत आहे. त्यानुसार आता पक्षातर्फे नवीन अध्यक्षांचा शोध सुरू असून भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी व धरणगावचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्‍वर महाजन यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. श्री चौधरी हे तेली समाजाचे आहेत, तर महाजन हे माळी समाजाचे आहेत.मात्र याबाबत अंतीम निर्णय अद्याप झालेला नाही.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com