राज्यात आणखी दोन मृत्यू : रुग्णांची संख्या २२०; कोरोनामुक्त ३९ रुग्णांना घरी सोडले

महाराष्ट्रासाठी पुढील काही आठवडे महत्त्वाचे असणार आहेत.
corona 11
corona 11

पुणे  : राज्यात कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेल्या आणखी १७ रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २२० झाली आहे. तसेच, कोरोनाचा संसर्गाच्या दोन रुग्णांचा आज मृत्यू झाला. त्यापैकी एक पुण्याचा रुग्ण असून, दुसरा मुंबईचा आहे. आतापर्यंत या आजाराने राज्यात दहा जण मृत्युमुखी पडले आहेत.
नवीन रुग्णांमध्ये ८ रुग्ण मुंबईचे आहेत तर ५ रुग्ण पुण्याचे, २ नागपूरचे, तर नाशिक आणि कोल्हापूर येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे. याशिवाय मुंबई येथील आणखी काही रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.
राज्यात करोना बाधित दोन रुग्णांचे मृत्यू झाले. एका ७८ वर्षीय पुरुषाचा मुंबईतील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांना उच्च रक्तदाब आणि हृदयरोग हे इतर आजारही होते. तर, करोना बाधित ५२ वर्षीय पुरुषाचा पुण्यातील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांना मधुमेह व उच्च रक्तदाबाचा त्रास होता.

राज्यात ३२८ जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत. ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात १८ जानेवारीपासून आजपर्यंत चार हजार ५३८ जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी तीन हजार ८७६ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोनासाठी निगेटिव्ह आले आहेत तर २२० जण पॉझिटिव्ह आहेत. आतापर्यंत ३९ करोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात १९ हजार १६१ व्यक्ती होम क्वारंटाइन असून एक हजार २२४ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

दृष्टिक्षेपात राज्यातील कोरोना उद्रेक

जिल्हा / मनपा बाधित रुग्ण मृत्यू
 
मुंबई ९२ ०७
पुणे ( शहर व ग्रामीण भाग ) ४३ ०१
 
सांगली २५ ००
 
मुंबई वगळून ठाणे मंडळातील इतर मनपा २३  ०१
 
नागपूर १६ ००
यवतमाळ ०४ ००
नगर ०५ ००
सातारा, कोल्हापूर ०२ ००
औरंगाबाद, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोंदिया, जळगाव, बुलडाणा, नाशिक ०१ ०१ (बुलडाणा) 
इतर राज्य – गुजरात ०१ ००

पुण्यात तीन नवीन रुग्ण
पुण्यातील तीन रुग्णांना कोरोना विषाणूंचा संसर्ग झाल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. त्यातील दोन रुग्ण हे एका खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या रुग्णाचे नातेवाईक आहेत. तर, तिसरा रुग्ण हा बर्म्युडा येथून प्रवास करून पुण्यात आला आहे.

..............................................

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com