मुंबई बाजार समिती : महाविकास आघाडीचे प्रविण देशमुख, माधवराव जाधव आघाडीवर  

सहकार क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्‍या मुंबई बाजार समिती निवडणूकीच्या मतमोजणीला मुंबई येथे सुरूवात झाली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार अमरावती विभागातील एक हजार ४०० यापैकी जवळपास पाचशे मतांची मोजणी पुर्ण झाली आहे. यात महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार आघाडीवर आहेत
Madhavrao Jadhav Pravin Deshmukh Leading in Mumbai Market Committe Election
Madhavrao Jadhav Pravin Deshmukh Leading in Mumbai Market Committe Election

यवतमाळ : सहकार क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्‍या मुंबई बाजार समिती निवडणूकीच्या मतमोजणीला मुंबई येथे सुरूवात झाली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार अमरावती विभागातील एक हजार ४०० यापैकी जवळपास पाचशे मतांची मोजणी पुर्ण झाली आहे. यात महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार आघाडीवर आहेत.

प्रवीण देशमुख यांना १८९, माधवराव जाधव १८३, तर पांडूरंग पाटील यांना १२३ मते मिळाली आहे. देशातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या मुबंई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक मतमोजणी ला सुरूवात झाली आहे. या निकालाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. 

अमरावती महसूल विभाग मतदारसंघातील दोन जागांसाठी यावेळी तब्बल 26 अर्ज दाखल झाले होते. १९ उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर  सात उमेदवार आखाड्यात होते. निवडणुकीत ९९ टक्के मतदान झाले होते. मतमोजणीला आज (ता.२) मुंबई येथील बाजार समितीच्या मुख्यालयात सकाळपासून सुरूवात झाली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात अमरावती विभागातील महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार आघाडीवर आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com