Two killed in Gondia helicopter crash | Sarkarnama

गोंदियात विमान अपघातात दोन ठार 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 26 एप्रिल 2017

गोंदियातील राजीव गांधी वैमानिक प्रशिक्षण केंद्रातील विमान कोसळल्याने झालेल्या अपघातात एक प्रशिक्षक पायलट व प्रशिक्षणार्थी तरुणी ठार झाली. ही घटना गोंदियापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या देवरी (रायपूर) येथे घडली. 

नागपूर : गोंदियातील राजीव गांधी वैमानिक प्रशिक्षण केंद्रातील विमान कोसळल्याने झालेल्या अपघातात एक प्रशिक्षक पायलट व प्रशिक्षणार्थी तरुणी ठार झाली. ही घटना गोंदियापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या देवरी (रायपूर) येथे घडली. 

गोंदियातील बिरसी विमानतळावर राजीव गांधी वैमानिक प्रशिक्षण केंद्रातील विमानाचा सकाळी साडेनऊ वाजता हा अपघात घडला. बिरसी विमानतळावरून सकाळी नऊ वाजता उड्डाण घेतल्यानंतर हे विमान गोंदियाच्या पश्‍चिमेस तिरोडा तालुक्‍यातील देवरी (रायपूर) गावाच्या सीमेत असताना विमानात अचानक बिघाड झाला. वैमानिकाने हे विमान नदीच्या काठावर उतरविण्याचा प्रयत्न केला. हे करताना विमान एका तारेला अडकल्याने नदीत असलेल्या डोंग्यावर कोसळले. प्रशिक्षक पायलटचे नाव रंजन गुप्ता (38) होते तर प्रशिक्षणार्थी हिमानी गुरुदयाल सिंग (24) मूळ दिल्लीची असलेली ही तरुणी या अपघातात ठार झाली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख