लॉकडाऊनच्या काळात राज्यात २४२ सायबर गुन्हे दाखल; फसवणुकीला बळी न पडण्याचे आवाहन 

कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये,काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र सायबर विभागाने त्यांच्याविरुद्ध कठोर पाऊले उचलली असून राज्यात २४२ गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाने दिली
Two forty Two Cyber Crimes registered in Maharashtra During Lock Down Time
Two forty Two Cyber Crimes registered in Maharashtra During Lock Down Time

मुंबई : कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये,काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र सायबर विभागाने त्यांच्याविरुद्ध कठोर पाऊले उचलली असून राज्यात २४२ गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाने दिली.

टिकटॉक ,फेसबुक ,ट्विटर व अन्य social media वर चालणाऱ्या गैरप्रकारांसंदर्भात  राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये  ज्या २४२गुन्ह्यांची  नोंद झाली आहे त्यापैकी ८ गुन्हे अदखलपात्र (N.C )आहेत.

यामध्ये  प्रामुख्याने बीड २७, पुणे ग्रामीण १९, मुंबई १७, कोल्हापूर १६, जळगाव १४, सांगली १०, नाशिक ग्रामीण १०, जालना ९, सातारा८, नाशिक शहर ८, नांदेड ७, परभणी ७, ठाणे शहर ६, सिंधुदुर्ग ६, नागपूर शहर ५, नवी मुंबई ५,सोलापूर ग्रामीण ५, लातूर ५, बुलढाणा ५, पुणे शहर ४, गोंदिया ४, ठाणे ग्रामीण ४, सोलापूर शहर ३, रायगड २, हिंगोली २, वाशिम १,धुळे १,यांचा समावेश आहे 

.या सर्व गुन्ह्यांचे विश्लेषण केले असता असे निदर्शनास आले की, आक्षेपार्ह व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी ११० तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी ८२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. titktok विडिओ शेअर प्रकरणी ४ गुन्हे तर ट्विटर द्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ३ गुन्हे दाखल झाले आहेत .तर अन्य सोशल मीडियाचा ( ऑडिओ क्लिप्स, youtube) गैरवापर केल्या प्रकरणी ४१ गुन्हे दाखल झाले आहेत. आतापर्यंत ४७ आरोपींना अटक केली आहे. ३१ आक्षेपार्ह पोस्ट्स takedown करण्यात यश आले आहे.

अमरावती शहरांतर्गत फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये काल एका नवीन गुन्ह्याची नोंद करण्यात आली. ज्यामुळे अमरावती जिल्ह्यातील नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या ४ वर गेली आहे . सदर गुन्ह्यातील आरोपीने आपल्या फेसबुक प्रोफाईलवर कोरोना महामारीच्या काळात लॉकडाऊन सुरु असताना देखील दोन धर्मात तेढ निर्माण होऊन ,परिसरातील शांतता बिघडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असा मजकूर असणाऱ्या पोस्ट्स टाकल्या होत्या.

ऑनलाइन फसवणूक.. सावध रहा

सध्या लॉकडाउनच्या काळात बरेच व्हाटसअँप मेसेजेस फिरत आहेत .या मेसेजेस मध्ये लोकांना एकतर मोबाईल रिचार्ज  ऑनलाईन करण्यासाठी,किंवा कोणत्याही वेबसेरीजचे subscription स्वस्तात आहे ,खालील लिंकवर क्लिक करा असा मजकूर असतो व एक लिंक दिली असते . आपण कोणीही अशा लिंक्सवर क्लिक करू नये .कारण सदर लिंक्स व मेसेजेस हे सायबर गुन्हेगारांची लोकांना फसविण्याची नवीन युक्ती आहे . तुम्ही जर त्या लिंकवर क्लीक केले तर एक फॉर्म उघडतो ज्यात तुम्हाला तुमच्या बँक अकाउंट्सचे सर्व डिटेल्स,पासवर्डस ,डेबिट/क्रेडिट कार्ड्सची माहिती ,पिन क्रमांक सर्व विचारले जाते.  

तुम्ही ही सर्व माहिती दिली की, एक OTP येतो व तो जाणून घेण्यासाठी एक फोन येतो. पलीकडून संभाषण करणारी व्यक्ती आपण त्या कंपनीमधूनच बोलतोय असा आभास निर्माण करून तो OTP,  तुमच्याकडून काढून घेते व काही वेळाने तुम्हाला तुमच्या बँकेचा sms येतो की तुमच्या खात्यातून काही रक्कम अनोळखी खात्यात वळविली गेली आहे . त्यामुळे सर्व नागरिकांनी अशा कोणत्याही खोट्या मोहात फसू नये .तसेच जर आपण चुकून फसविले गेले असाल तर त्याची तक्रार नजीकच्या पोलीस ठाण्यात करावी व www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर पण नोंद करावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर  विभागामार्फत करण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com