`मोदी दुतोंडी आणि ढोंगी, तर राहुल गांधी मानवतावादी'; आमदार प्रणिती शिंदेंने केला व्हिडिओ ट्विट 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची तुलना करणारा एक व्हिडिओ आमदार प्रणिती शिंदे यांनी आज सकाळी ट्विट केला आहे. त्यामध्ये केवळ भाषण देणारे पंतप्रधान मोदी आणि मदतीसाठी धावून जाणारे राहुल गांधी दाखवले आहेत.
`मोदी दुतोंडी आणि ढोंगी, तर राहुल गांधी मानवतावादी'; आमदार प्रणिती शिंदेंने केला व्हिडिओ ट्विट 

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची तुलना करणारा एक व्हिडिओ आमदार प्रणिती शिंदे यांनी आज सकाळी ट्विट केला आहे. त्यामध्ये केवळ भाषण देणारे पंतप्रधान मोदी आणि मदतीसाठी धावून जाणारे राहुल गांधी दाखवले आहेत.

`सत्य परिस्थिती दांभिक माणसाला उघडे पाडते' अशी टीपण्णी करून हा व्हिडिओ आमदार शिंदे यांनी शेअर केला आहे. `दुतोंडी पंतप्रधान', `ढोंगी' असे हॅशटॅग वापरून पंतप्रधान मोदींवर शेलक्या शब्दांत टीका केली आहे. त्याचवेळी `मानवतेसाठी राहुल गांधी' हॅशटॅग वापरून राहुल गांधीची स्तुती केली आहे.

गेल्या आठवड्यात राहुल गांधी ओडिशाच्या दौऱ्यावर असताना भुवनेश्वर विमानतळावरील एक दृश्य व्हायरल झाले होते. त्यात एक छायाचित्रकार चार-पाच फुटांवरून पडल्यावर त्याला मदतीला धावून जाणारे राहुल गांधी दिसत आहेत. 

मदतीला धावून जाणाऱ्या राहुल गांधी यांच्या व्हिडिओबरोबर साधारणतः पाच वर्षांपूर्वीचा मोदींचा भाषण देतानाचा व्हिडिओ जोडला आहे. त्यात गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री असताना मोदी भाषण देत आहेत आणि शेजारी एक अधिकारी चक्कर येऊन कोसळताना दिसत आहेत.

हा तुलनात्मक व्हिडिओ कॉंग्रेसकडून राहुल गांधी यांच्या भुवनेश्वर दौऱ्यापासून व्हायरल केला जात आहे. यापूर्वीही मोदींचा वरील व्हिडिओ अनेक वेळा वापरला गेला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com