नागपूर उत्तरमध्ये विजयाचे गणित मांडताहेत दोन डॉक्‍टर

उत्तर नागपुरात भाजपाचे डॉ. मिलिंद माने, कॉंग्रेसचे डॉ. नितीन राऊत तर बसपाचे सुरेश साखरे यांच्यात खरी लढत आहे. तिन्ही उमेदवारांनी स्वतःचे मतदान केल्यानंतर दिवसभर मतदारसंघ पालथा घातला. सकाळी साडेसात वाजता मतदान सुरू होताच, मतदार येण्यास सुरूवात झाली. केंद्रावर मतदानासाठी मतदारांची गर्दी दिसली नाही. मात्र हळुहळू मतदानाचा टक्का पुढे पुढे सरकत होता. तरूणाईने यावेळी आपले मत गुपित ठेवले असून कोणतीही चर्चा न करता शांतपणे मतदान करून निघून जात होते. सर्वसाधारण मतदारांतील दलित, ओबीसी, अल्पसंख्यांक व इतर समाजातील मतदार कॉंग्रेस, भाजप आणि बसपाच्या निवडणूक रिंगणातील उमेदवारांबाबत चर्चा करीत होते.
Milind Mane - Nitin Rau
Milind Mane - Nitin Rau

नागपूर : कधीकाळी उत्तर नागपूर हा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला. खोरिपाचा गड. परंतु पंधरा वर्षे कॉंग्रेसच्या ताब्यात हा गड होता. नंतर 2014 मध्ये हा उत्तर मतदारसंघ भाजपाने आपल्या ताब्यात घेतला. यावेळी मात्र उत्तर कोण सर करणार याचे गुढ कायम आहे. येथील 360 मतदान केंद्रावर 3 लाख 84 हजार 595 मतदार राजांच्या मतांवर दावा सांगत भाजप, कॉंग्रेस, बसपासह वंचितच्या उमेदवार आपणच कसे निवडून येऊ, याचे गणित मांडणे सुरु केले आहे. मात्र, कमी प्रमाणात झालेल्या मतदानामुळे उमेदवारांच्या ह्दयाचे ठोके वाढले असून झालेल्या मतदानानंतर गुरूवारच्या निकालातून उत्तरेतील मतदार उमेदवारांना 'उत्तर' देतील.

उत्तर नागपुरात भाजपाचे डॉ. मिलिंद माने, कॉंग्रेसचे डॉ. नितीन राऊत तर बसपाचे सुरेश साखरे यांच्यात खरी लढत आहे. तिन्ही उमेदवारांनी स्वतःचे मतदान केल्यानंतर दिवसभर मतदारसंघ पालथा घातला. सकाळी साडेसात वाजता मतदान सुरू होताच, मतदार येण्यास सुरूवात झाली. केंद्रावर मतदानासाठी मतदारांची गर्दी दिसली नाही. मात्र हळुहळू मतदानाचा टक्का पुढे पुढे सरकत होता. तरूणाईने यावेळी आपले मत गुपित ठेवले असून कोणतीही चर्चा न करता शांतपणे मतदान करून निघून जात होते. सर्वसाधारण मतदारांतील दलित, ओबीसी, अल्पसंख्यांक व इतर समाजातील मतदार कॉंग्रेस, भाजप आणि बसपाच्या निवडणूक रिंगणातील उमेदवारांबाबत चर्चा करीत होते. 

कुंदनलालनगर, बिनाकी ले-आऊट, दहा नंबर पुल जवळील नागसेन विद्यालय, गुरूनानक हायस्कुल, जरीपटक्‍यातील महात्मा गांधी सेन्टेनियल हायस्कुल, नारी रोडवरील स्व. कुणाल हायस्कुल, साई प्राणनाथ इंग्लीश हायस्कुल, कपीलनगर प्राथमिक शाळा, पंचशीनगरातील मनपा शाळा, बिनाकी ले-आऊटमधील विशाखा माध्यमिक विद्यालय, सिंधी हिंदी हायस्कुल, लष्करीबाग उच्च प्राथमिक शाळा, एससीएस गर्ल्स हायस्कुल, संगीता विद्यालय, भदन्त धम्मकिर्ती विद्यालय अशा उत्तर नागपुरातील चौफेर भागात मतदान करताना मतदारांमध्ये उत्साह होता. 

भाजप, कॉंग्रेसपासून तर बसपा आणि वंचितच्या उमेदवारांच्या विरोधात जनमानसात नाराजीचा सूर होता, असे स्पष्ट चित्र उत्तरेत दिसून आले. शरीराचे डॉक्‍टर असलेले डॉ. मिलिंद माने आणि साहित्याचे डॉक्‍टर असलेले डॉ. नितीन राऊत यांच्यात हा सामना रंगणार आहे. मात्र बसपामुळे एका डॉक्‍टरची होणारी वजाबाकी हेच यांच्या दुसऱ्या डॉक्‍टरच्या विजयाचे गणित ठरवणार आहे.

निवडणुकीत आंबेडकरी मतदार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घरातून निघाला खरा, परंतु कधीकाळी उत्तरेत निळ्या शक्तीचा विजय शक्‍य असताना कॉंग्रेस, भाजपाच्या उमेदवार बाजी मारतो, याची खंत चहाच्या टपरीवर गटातटांत विखुरलेला रिपब्लिकन कार्यकर्ता व्यक्त करीत होता. सहा महिन्यांपासून आता लढूया एकीने हा संदेश समाजात पोहचल्यानंतरही समाजाचा एक उमेदवार नसल्यामुळे ही मोहीम वाया गेली, अशीही चर्चा होती.

मतदार महिला, फोटो पुरुषाचा
उत्तर नागपुरातील नागसेन विद्यालयातील निवडणूक क्षेत्रीय अधिकारी असलेल्या सारिका कडू यांच्या मतदान केंद्रात राजस प्रभाकर बावने या महिलेच्या फोटोच्या जागेवर पुरुषाचा फोटो आढळला. त्यामुळे या महिलेस निवडणुकीतील मतदानाच्या हक्कापासून दूर राहावे लागणार होते. परंतु, खुद्द उमेदवार यावेळी हजर झाल्यामुळे तसेच बुथ कार्यकर्त्यानी ओळख सांगितल्यांनतर मतदान करू दिले. याशिवाय किदवाई प्राथमिक शाळेत मो. अबिर असुल अंसारी हा मतदार मतदान करण्यासाठी आला असता, त्याचे मतदान झाले असल्याचे दिसून आले. सर्व प्रकारची चौकशी करण्यात आल्यानंतर नावात सारखेपणा आढळल्यामुळे मतदान झाले असे सांगण्यात आले.

किदवाई केंद्रावर रात्री उशीरापर्यंत मतदान
उत्तर नागपुरातील किदवाई हा मुस्लिम बहुल परिसर. येथे 1289 मतदारांची संख्या आहे. यासाठी किमान दोन केंद्राची गरज होती. मात्र एकाच खोलीत मतदान घेण्यात येत होते. यामुळे मोठ्या प्रमाणात मतदार महिलापुरुषांना प्रतिक्षा करावी लागत होती. सायंकाळी 5 वाजून गेल्यानंतरही येथे महिलांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com