दोन लाचखोर सहायक फौजदार सेवेतून बडतर्फ

काही रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कालच त्यांना सापळा लावून त्यांना रंगेहाथ पकडले होते.
two asi dismissed in pune
two asi dismissed in pune

शिरूर (पुणे): पुणे जिल्हा पोलिस दलातील दोन लाचखोर सहायक फौजदारांना सेवेतून बडतर्फ करण्याचा आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिला. 

मंचर पोलिस ठाण्यातील सुधाकर बाबूराव जाधव व रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यातील सुधाकर दगडू कोळेकर अशी त्यांची नावे आहेत. न्यायालयीन वॉरंट बजावणीप्रकरणी जाधव यांनी लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी प्राप्त पुराव्यांच्या आधारे जाधव यांच्याविरूद्ध मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्याचप्रमाणे, रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या एका संशयित आरोपीला बेकायदा मदत करण्यासाठी कोळेकर यांनी त्याच्याकडे व त्याच्या नातेवाइकांकडे लाचेची मागणी केली होती. काही रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कालच त्यांना सापळा लावून त्यांना रंगेहाथ पकडले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com