केजरीवालांच्या विजयावरून कॉंग्रेसचे माकेन आणि देवरा यांच्यात जुंपली

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विजयामुळे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अजय माकेन आणि मिलिंद देवरा यांच्यातच भांडणे जुंपली आहेत.
twitter spats between congress leader maken and deora over delhi election
twitter spats between congress leader maken and deora over delhi election

पुणे - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विजयामुळे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अजय माकेन आणि मिलिंद देवरा यांच्यातच भांडणे जुंपली आहेत. 

या राजकीय नाट्याची सुरवात देवरा यांनी केजरीवाल यांचे अभिनंदन केल्याचे ट्विट केले. हे ट्विट करताना त्यांनी केजरीवाल सरकारमुळे दिल्लीची आर्थिक भरभराट केल्याचे नमूद केले आहे. देवरा यांनी केजरीवाल यांची अशी तळी उचलल्यामुळे माकेन भडकले आणि त्यांनी ट्विट करीत देवरांना सुनावले. चक्क देवरांनी कॉंग्रेसला रामराम ठोकवा आणि मगच अर्धवट माहिती सांगावी, असं म्हटलं. 

माकेन यांच्या उत्तराला तोडीस तोड उत्तर देवरा यांनी देत शिला दीक्षित यांच्या कार्यकाळात दिल्लीची भरभराट झाली आहेच, असे नमूद केले. अर्धवट बातम्या पेरण्याची खायसियत तुमची असल्याचा टोला देवरांनी माकेन यांना लगावला आहे. 

हे ट्विटर युद्ध अजूनही सुरूच आहे.... 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com