कर्नाटकातील काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांचा राजीनामा; बंडखोरांना मंत्रीपदे देणार

कर्नाटकातील राजकीय संघर्षाला आणखी धार चढल्यानंतर काँग्रेसच्या सर्व 22 मंत्र्यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शविली असून, बंडखोर आमदारांना मंत्रिपदाची संधी देण्यात येणार आहे.
कर्नाटकातील काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांचा राजीनामा; बंडखोरांना मंत्रीपदे देणार

बंगळूर : कर्नाटकातील राजकीय संघर्षाला आणखी धार चढल्यानंतर काँग्रेसच्या सर्व 22 मंत्र्यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शविली असून, बंडखोर आमदारांना मंत्रिपदाची संधी देण्यात येणार आहे. 

तेरा आमदारांच्या बंडांनंतर काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाची (जेडीएस) आघाडी 'डॅमेज कंट्रोल मोड'मध्ये गेली होती. त्यानंतर आज (सोमवार) माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काँग्रेसचे सर्व 22 मंत्री राजीनामा देणार असल्याचे सांगितले. कर्नाटकातील सरकार स्थिर असल्याचे काँग्रेस नेते जमीर अहमद यांनी म्हटले आहे.

या दोन्ही पक्षांकडून बंडखोरांची मनधरणी सुरू असून, भाजपनेही आधी विधानसभा अध्यक्षांना निर्णय घेऊ द्या, मग आम्ही सत्ता स्थापनेचे बघू, असे वक्तव्य केले आहे. या घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी हे आज सायंकाळी न्यूयॉर्कमधून थेट बंगळूरमध्ये दाखल होणार आहेत, त्यानंतर ते सत्ताधारी पक्षाच्या आमदारांची बैठक घेऊन चर्चा करतील. कर्नाटकमधील या राजकीय अस्थैर्यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला आहे. 

तर, आज संसदेतही याचे पडसाद पाहायला मिळाले. सध्या मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलात तळ ठोकलेले दहाही आमदार भाजपच्या गळाला लागल्याचे समजते. कर्नाटकमधील 'ऑपरेशन कमळ'ची सूत्रे सध्या केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्या हाती असून, राज्य सरचिटणीस अरविंद लिम्बावली हेदेखील यात सहभागी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com