वडगाव नगरपंचायतीत निधीवाटपावरून आघाडी-भाजपमध्ये 'तूतू-मैमै'

विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समितीमधून वडगाव शहरातील विकासकामांसाठी सुमारे चार कोटी 33 लाखांचा निधी मंजूर झाला होता. त्यात शहरातील सतरा प्रभागांपैकी तेरा प्रभागांतील विकासकामांचा समावेश होता. नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत हा निधी सर्व प्रभागांत समान वाटप करण्याचा ठराव बहुमताने मंजूर करून घेण्यात आला.
Tussle over funds in Congress Ncp and Bjp at Vadgaon Maval Nagar Panchayat
Tussle over funds in Congress Ncp and Bjp at Vadgaon Maval Nagar Panchayat

वडगाव मावळ : भाजप सत्तेवर असताना मंजूर झालेला पावणेचार कोटींचा निधी सर्व प्रभागांत समान वाटप करण्याचा ठराव वडगाव नगरपंचायतीत सत्तेवर असलेल्या कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसने दबाव तंत्राचा वापर करून मंजूर करून घेतल्याचा आरोप भाजपच्या चार नगरसेवकांनी केला आहे. हा निधी परत गेल्यास त्यास भाजप जबाबदार राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समितीमधून वडगाव शहरातील विकासकामांसाठी सुमारे चार कोटी 33 लाखांचा निधी मंजूर झाला होता. त्यात शहरातील सतरा प्रभागांपैकी तेरा प्रभागांतील विकासकामांचा समावेश होता. नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत हा निधी सर्व प्रभागांत समान वाटप करण्याचा ठराव बहुमताने मंजूर करून घेण्यात आला.

सद्यःस्थितीत या निधीतून विविध प्रभागांत मंजूर करण्यात आलेली व सुरू असलेली कामे तशीच सुरू राहावीत व आगामी काळात मंजूर होणाऱ्या निधीचे समान वाटप करावे, अशी मागणी भाजपच्या सदस्यांनी सभेत केली होती. 

परंतु, या विषयावर मतदान होऊन निधीचे समान वाटप करण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. याबाबत भाजपचे गटनेते दिनेश ढोरे, माजी उपनगराध्यक्षा अर्चना म्हाळसकर, किरण म्हाळसकर, सुनीता भिलारे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्यांनी सत्तेचा व दबावतंत्राचा वापर करून हा ठराव मंजूर केल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपच्या काळात मंजूर झालेल्या निधीला व विकासकामांना 20 सप्टेंबर 2019 रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली होती. परंतु ही कामे सुरू करण्यासाठी जाणीवपूर्वक विलंब करण्यात आला. 

मुख्याधिकाऱ्यांवरही त्यासाठी दबाव टाकण्यात आला. तेरा प्रभागांतील विकासकामांच्या प्रस्तावांचा त्यात समावेश होता. चार प्रभागांतील प्रस्तावांमध्ये त्रुटी राहिल्याने व वेळेत न गेल्याने निधी मंजूर झाला नाही. भाजपची सत्ता असताना विकासकामांबाबत कधीही दुजाभाव केला नाही; परंतु आता सत्तेचा गैरवापर केला जात आहे. मंजूर झालेल्या निधीचे समान वाटप करण्याला विरोध असून, हा निधी परत गेल्यास भाजप जबाबदार राहणार नाही, असा इशारा या नगरसेवकांनी दिला.

सर्व सदस्यांचे म्हणणे ऐकून घेऊनच निधीचे समान वाटप करण्याचा ठराव बहुमताने मंजूर झाला आहे. भाजपच्या दोन सदस्यांनीही या ठरावाला विरोध न करता तटस्थ राहण्याची भूमिका घेतली, त्यामुळे दबावतंत्राचा वापर केल्याचा आरोप चुकीचा आहे. मंजूर झालेला निधी कोणत्याही परिस्थितीत परत जाणार नाही - मयूर ढोरे, नगराध्यक्ष, वडगाव नगरपंचायत

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com