उपमुख्यमंत्रीपदासाठी अशोकराव, थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांच्यात चुरस

सोनिया गांधी यांचे विश्‍वासू मानले जाणारे अहमद पटेल मुंबईमध्ये डेरेदाखल झाले आहेत. अहमद पटेल सर्व महत्त्वाच्या वाटाघाटींमध्ये सहभागी होत आहेत.
Prithviraj_Chavan_Ashok_Chavan_Balasaheb_Thorat
Prithviraj_Chavan_Ashok_Chavan_Balasaheb_Thorat

मुंबई : महाविकास आघाडीमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचाली अंतिम टप्प्यात आहेत. यामध्ये कॉंग्रेस पक्षाच्या वाट्याला उपमुख्यमंत्रिपद तसेच महसूल आणि सार्वजनिक बांधकाम यांसारखी महत्त्वाची खाती येण्याची दाट शक्‍यता आहे.

या पार्श्‍वभूमीवर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या तीन वरिष्ठ नेत्यांना महत्त्वाची खाती दिली जातील अशी शक्‍यता आहे. या तीन नेत्यांपैकी उपमुख्यमंत्रीपदासाठी पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते. महसूल खात्यासाठी अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांच्यात चुरस असल्याचे दिसते.

विधानसभेचे अध्यक्षपद आपल्याकडे राहावे यासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात जोरदार चुरस आहे. सध्याच्या परिस्थितीत विधानसभा अध्यक्षांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. सरकारमध्ये जर अस्थिरता निर्माण झाली तर त्या परिस्थितीतही विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारांत अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी येत असतात. त्यामुळे हे पद मिळविण्यासाठी दोन्ही कॉंग्रेसमध्ये ओढाताण कायम असल्याचे चित्र आहे.

याशिवाय विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, विश्‍वजित कदम, सतेज पाटील आदींच्या मंत्रिमंडळ समावेशाबाबत कॉंग्रेस वर्तुळात जोरदार हालचाली आहेत. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे विश्‍वासू मानले जाणारे अहमद पटेल मुंबईमध्ये डेरेदाखल झाले आहेत. अहमद पटेल सर्व महत्त्वाच्या वाटाघाटींमध्ये सहभागी होत आहेत. राजकीय हालचालींवर त्यांची बारकाईने नजर आहे आणि ते सोनिया गांधी यांच्या संपर्कात आहेत असे समजते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com