नाशिक जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी डाॅ तुषार शेवाळे

नाशिक जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी डाॅ तुषार शेवाळे यांची नियुक्ती झाली आहे. गेले दोन वर्षे जिल्हा अध्यक्ष पदाचा कार्यभार हंगामी अध्यक्षांकडे होता. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती झाल्याने कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.
Thusha Shewale Congress Nashik
Thusha Shewale Congress Nashik

नाशिक : नाशिक जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी डाॅ तुषार शेवाळे यांची नियुक्ती झाली आहे. गेले दोन वर्षे जिल्हा अध्यक्ष पदाचा कार्यभार हंगामी अध्यक्षांकडे होता. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती झाल्याने कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.

अखिल भारतीय काँग्रेस महासमितीने सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल विविध रिक्त पदी नियुक्त जाहीर केल्या. डाॅ. शेवाळे मालेगाव येथील आहेत. राज्यातील नावाजलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत धुळे मतदारसंघातील संभाव्य उमेदवार म्हणून काँग्रेसच्या जिल्हा समितीने त्यांच्या नावाची शिफारस केली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची या पदासाठी चर्चा होती. काल यासंदर्भात अधिकृत घोषणा झाली.त्यांच्या नियुक्ती नंतर कार्यकर्ते, पदाधिका-यांनी आनंद व्यक्त करीत त्यांचा सत्कार केला.

प्रदेश समितीच्या नव्या नियुक्त्यांत नाशिकच्या विविध पदाधिका-यांना संधी देण्यात आली आहे. मावळते जिल्हा अध्यक्ष राजाराम पानगव्हाने यांची प्रदेश प्रसिध्दी समितीत, माजी राज्यमंत्री डाॅ शोभा बच्छाव यांची जाहीरनामा समितीत, आमदार आसीफ शेख आणि माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांची प्रचार समितीत तर नगरसेविका डाॅ हेमलता पाटील यांची माध्यम व संपर्क समितीत समावेश करण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com