Tur Dal Shivsena CM | Sarkarnama

तुरडाळी वरुन शिवसेनेचे मंत्री आक्रमक -सरकार नमले?

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 25 एप्रिल 2017

शिवसेनेने तुर खरेदी केंद्र सुरू करण्याचा आग्रह धरल्याने पुन्हा खरेदी केंद्र सुरू करण्याचे मुख्यमंत्री आदेश दिले असल्याचे समजते. मात्र 22 तारखे पर्यंत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचीच तूर सरकार खरेदी करणार असल्याने पुन्हा पेच उभा राहणार आहे.

मुंबई - राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांची तूर खरेदी बंद केल्याने राज्यातील राजकारण चांगलेच पेटले आहे. तूर उत्पादक शेतकऱ्यांची तूर खरेदी करणेयासाठी बंद केलेली केंद्र पुन्हा सुरू करण्यासाठी सरकारवर दबाव वाढत चालला आहे. यातच सत्ताधारी शिवसेना मंत्र्यांनी आक्रमक होत तूर खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी लावून धरल्याने मुख्यमंत्री मात्र चांगलेच चिंतातुर झाल्याची माहिती सुत्रांनी दिली. शिवसेना मंत्र्यांच्या मागणी मान्य करत मुख्यमंत्र्यांनी अखेर शेतकऱ्यांची तूर घेण्यास मंजूरी दिली असल्याचे समजते.

राज्यातील दीड लाख तूर उत्पादक शेतकऱ्यांकडून बाराशे कोटींची विक्रमी ३४ लाख क्विंटल तुरीची खरेदी झाली करण्यात आली आहे. खरेदीची मुदतवाढ मिळाली तर आणखी १४ लाख क्विंटर तुरीची खरेदी होण्याची शक्यता असल्याचेही सुत्रांनी सांगितले. विरोधी पक्षाच्या संघर्ष यात्रेचा आता तिसरा टप्पा सुरू होत आहे. त्यामुळे तूर खरेदी बंद केल्याने सरकारविरोधी वातावरण तयार होण्यास मदत मिळणार असल्याने सत्ताधारी चांगलेच अडचणीत सापडले होते.

त्यात आता शिवसेनेने तुर खरेदी केंद्र सुरू करण्याचा आग्रह धरल्याने पुन्हा खरेदी केंद्र सुरू करण्याचे मुख्यमंत्री आदेश दिले असल्याचे समजते. मात्र 22 तारखे पर्यंत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचीच तूर सरकार खरेदी करणार असल्याने पुन्हा पेच उभा राहणार आहे.

दरम्यान, तूर खरेदीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सरकारला इशारा दिला आहे. शेतकरी संघटना, काँग्रेस राष्ट्रवादीपाठोपाठ मनसेनेही खळ्ळ् खट्याकचा इशारा दिला आहे. त्यात आता सहकारी मित्रपक्षाचे मंत्री चांगलेच अक्रमक झाल्याने  शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यासाठी केंद्र सुरू पुन्हा करण्याची सरकारने तयारी दर्शवली आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख