तुपे आणि टिंगरे गेले मुंबईला, दोघेही शरद पवार यांच्यासोबतच...

तुपे आणि टिंगरे गेले मुंबईला, दोघेही शरद पवार यांच्यासोबतच...

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुण्यातील आमदार चेतन तुपे व सुनील टिंगरे नेमके कुणाच्या बाजूने जाणार याची चर्चा सकाळपासून सुरू होती. मात्र, हे दोन्ही आमदार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत बोलावलेल्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी सकाळी पुण्यातून मुंबईला रवाना झाले. 

उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांत एकच खळबळ उडाली. सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये या एकाच विषयाची चर्चा सकाळपासून होती. या पार्श्‍वभूमीवर पुण्यातील या आमदारांच्या भूमिकेकडे लक्ष लागले होते. राज्यातील परिस्थिती काहीही असली तरी हे दोघेही शरद पवार यांच्यासोबतच राहणार असल्याचे या दोघांच्यावतीने सांगण्यात आले. 

अजित पवार यांनी बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत असलेल्या सर्वच आमादार परत येतील या दृष्टीने प्रयत्नांना सुरवात करण्यात आली. त्याला बऱ्यापैकी यश आहे. सहा आमदार वगळता इतर सुमारे आठ जणांशी संपर्क साधण्यात यश मिळाल्याचे सांगण्यात आहे. त्यामुळे अजित पवार यांच्यासोबत शपथविधीला असलेल्या 15 पैकी बहुतांश आमदार परत आणण्यात पक्षाला यश आल्याचे सांगण्यात येत आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com