Tulsi Gabbard to fight American presidential election ! | Sarkarnama

तुलसी गॅबार्ड अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढणार ? 

वृत्तसंस्था
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

वॉशिंग्टन :  अमेरिकी अध्यक्षपदाची  2020 वर्षात होणारी  निवडणूक लढविण्याबाबत गांभीर्याने विचार करत असल्याचा  सूतोवाच हिंदूधर्मीय  खासदार तुलसी गबार्ड यांनी केला आहे. 

अमेरिकी संसदेत चार वर्षांपासून हवाई क्षेत्राचे प्रतिनिधित्त्व करणाऱ्या डेमॉक्रॅटिक पक्षाच्या खासदार गबार्ड यांनी प्रथमच अध्यक्षपदाची निवडणूक लढण्याचे सूतोवाच केले आहे.त्या ३७ वर्षांच्या आहेत . 

अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात एखादे पद धारण करणाऱ्या पहिल्या हिंदू व्यक्ती आहेत.     २०१२ आणि २०१६ असे सलग दोन वेळा  गॅबार्ड  हवाई प्रांतातून   अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाच्या सदस्य म्हणून निवडून आलेल्या आहेत . 

 तुलसी गॅबार्ड यांनी अमेरिकन प्रतिनिधीगृहाच्या(काँग्रेसच्या) भगवद्‌गीतेवर हात ठेवून पदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली घेतली होती त्यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या . 
 
एका वृत्तवाहिनीशी बोलताना गबार्ड म्हणाल्या, की आपल्या देशातील स्थितीवरून आपण चिंतेत आहोत. त्यामुळे निवडणूक लढण्याचा गांभीर्याने विचार करत आहे. जर तुलसी गबार्ड यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरण्याचा विचार केला तर त्या निवडणूक लढणाऱ्या पहिल्या हिंदू उमेदवार असतील. 

यापूर्वी गॅबार्ड होनोलुलू महापालिकेच्या सदस्य होत्या.  

 नोव्हेंबर 2020 मध्ये  अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे .  प्रारंभी त्यांना  आपल्या डेमॉक्रॅटिक पक्षांतर्गत   निवडणूक लढऊन पक्षाची उमेदवारी मिळवावी लागेल . त्यात जर त्यांची पक्षाने निवड केली तर त्यांना    डोनाल्ड ट्रम्प  यांच्याविरुद्ध निवडणूक लढविता येईल . 

अध्यक्षपदाची निवडणूक लढण्यासंदर्भात गेल्या काही महिन्यांपासून गबार्ड या आपल्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करत आहेत आणि भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिकांशीदेखील संपर्क करत आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख