तुळजापुरात चव्हाणांना राणाजगजितसिंह आव्हान देणार ? 

युती झाल्यावर राणाजगजितसिंह पाटील यांची उमेदवारी तुळजापुर मतदारसंघात निश्चित मानली जात आहे. त्यामुळे हे आव्हान मधुकरराव चव्हाण यांना पेलणार का याविषयी आता चर्चा होऊ लागली आहे.
Patil-Chavan
Patil-Chavan

उस्मानाबाद  :  जिल्ह्यातील तुळजापुर मतदारसंघात पुन्हा एकदा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण लढण्यासाठी सज्ज आहेत.

त्यांच्याविरोधात अनेकांनी लढण्याचा इरादा जाहीर केला असुन त्यामध्ये अशोक जगदाळे, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे,देवानंद रोचकरी यांच्याव्यतिरिक्त ऐनवेळी राणाजगजितसिंह पाटील देखील या मतदारसंघात भाजपच्या तिकीटावर लढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 

यावेळी मधुकरराव चव्हाण यांच्यासमोर निश्चितच तगडे आव्हान उभ राहणार असल्याचे चित्र आहे. दर निवडणुकीत कोणतातरी फॅक्टर मधुकरराव चव्हाण यांच्या कामी येतो त्या बळावर ते निवडणुकीत विजय प्राप्त करतात हा आजवरचा इतिहास आहे.उमेदवाराची वाढलेली संख्या ही त्यांच्यासाठी जमेची बाजु असते. 

यंदाही तशीच परिस्थिती असली तरी यावेळी मात्र मधुकरराव चव्हाण यांच्याविरोधात वातावरण तयार झाल्याचे चित्र आहे. त्यातही युती झाल्यावर राणाजगजितसिंह पाटील यांची उमेदवारी तुळजापुर मतदारसंघात निश्चित मानली जात आहे. त्यामुळे हे आव्हान मधुकरराव चव्हाण यांना पेलणार का याविषयी आता चर्चा होऊ लागली आहे.

 राणाजगजितसिंह यांचा थेट संपर्क असलेले उस्मानाबाद तालुक्यातील 72गावे या मतदारसंघात येतात, तसेच तुळजापुरात त्यांच्या गटाची नगरपालिका असुन त्याचाही त्याना फायदा होण्याची शक्यता आहे. भाजप व सेनेची वोट बँक सुध्दा राणाजगजितसिंह यांच्या फायद्याची ठरणार आहे.

त्यातही तुळजापुरातुन जवळपास मधुकररावांसह  तीन ते चार उमेदवार असल्याने व उस्मानाबाद तालुक्यातील 72 गावातील राणाजगजितसिंह हे एकमेव उमेदवार राहिले तर मधुकरराव चव्हाण यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

तरीही गेल्या काही वर्षापासुन मधुकरराव यांचा संपर्क व कामाचा धडाका असल्याने ही लढत नक्कीच चुरशीची होणार यात शंका नाही.

या मतदारसंघात देवानंद रोचकरी यांना मानणारा मोठा वर्ग असुन दरवेळी तीस ते चाळीस हजाराच्या आसपास त्याना मतदान पडत असल्याचे आजवर पाहावयास  मिळाले आहे. आता उद्योजक अशोक जगदाळे, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी सज्ज आहेत. युती न झाल्यास मात्र या मतदारसंघात वेगाने घडामोडी घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com