tuljapur | Sarkarnama

तुळजापूर नगरपालिकेवर पोलिसांचा छापा

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 20 एप्रिल 2017

तुळजापूर : तुळजापूर पालिकेत 2011 मध्ये झालेल्या 1 कोटी 62 लाख रुपयांच्या यात्रा अनुदान घोटाळा प्रकरणी आज (ता. 20) दुपारी एकच्या सुमारास पोलिसांनी नगरपालिकेच्या कार्यालयावर छापा टाकला. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह 25 ते 30  कर्मचाऱ्यांनी नगरपालिकेत छापा टाकून तपासणी सुरु केली. यावेळी कुणालाही आत प्रवेश देण्यात आला नाही. 

तुळजापूर यात्रेसाठी देण्यात येणाऱ्या यात्रा अनुदानात गैरव्यवहार केल्याप्रकरणी तत्कालीन नगराध्यक्ष अर्चना गंगणे यांच्यासह 
मुख्यकार्यकारी अधिकारी, लेखापाल, व नगरसेवक यांच्यासह 25 जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आज अचानक नगरपालिकेवर छापा टाकत कार्यालयातील फाईली व कागदपत्रांची तपासणी सुरू केली. या छाप्या संदर्भात पोलिसांनी गुप्तता पाळली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख