तुकाराम मुंढेंवर आरोप करणाऱ्या महापौरांच्या प्रभागातच घंटागाडी गायब!  

तुकाराम मुंढेंवर आरोप करणाऱ्या महापौरांच्या प्रभागातच घंटागाडी गायब!  

नाशिक: स्वच्छ भारत अभियानात स्थान मिळविण्यासाठी प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू आहे. यासंदर्भात प्रशासन किती गंभीर आहे याची खात्री करण्यासाठी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मंगळवारी पहाटे अंधारातच शहरभर फेरफटका मारुन खातरजमा केली.

त्यात 160 सफाई कर्मचारी गैरहजर तर अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांनी सफाईसाठी रोजंदारीवर बाहेरचे लोक नेमलेले आढळले. अनेक अधिकारी यावर लक्षच देत नसल्याचा धक्कादायक प्रकार आढळला. या सगळ्यांना आयुक्तांनी 'मुंढे' स्टाईल शॉक दिला आहे.

नागरीक तसेच नगरसेवकांच्या अस्वच्छतेच्या प्राप्त तक्रारींची दखल घेत तुकाराम मुंढे यांनी शहरातील स्वच्छतेच्या कामाचा आढावा घेतला. त्यासाठी मंगळवारी (ता. 13) भल्या पहाटे अंधारातच त्यांनी स्वतः स्टिंग ऑपरेशन राबविले. यामध्ये प्रमुख अधिकाऱ्यांनी विविध भागांत केलेल्या पाहणीत आरोग्य विभागाच्या कारभाराचे वाभाडे निघाले. नगरसेवकांच्या आरोपांवर शिक्कामोर्तब झाले.

स्टिंग ऑपरेशनमध्ये सुमारे 160 कर्मचारी विनापरवानगी गैरहजर, 207 कर्मचारी रजेवर असले, तरी त्यांची रजा मंजूर झाली की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. शहरातील सफाईचे स्टिंग ऑपरेशन केल्यानंतर आयुक्त मुंढे यांनी सहा विभागीय अधिकाऱ्यांची हजेरी घेतली.

फिरण्यासाठी वेळ मिळत नसल्याचे उत्तर मिळाल्याने आयुक्त मुंढे यांनी नोटिसा बजावण्याचे आदेश दिले. घनकचरा व्यवस्थापक डॉ. सचिन हिरे यांच्या विभागीय चौकशीचे आदेश दिल्याचे समजते.  एकतीस प्रभागांत एकाचवेळी केलेल्या या स्टिंग ऑपरेशनमध्ये अनेक धक्कादायक प्रकार उघड झाले. प्रभाग 23 मध्ये बाहेरच्या व्यक्तीकडून सफाई सुरु होती.

त्यांना सफाई कर्मचाऱ्याने रोजंदारीवर नेमल्याचे आढळले. अनेक कर्मचारी पाच ते सहा महिन्यांपासून गायब होते. प्रत्येक हजेरी शेडवर निम्म्यापेक्षा अधिक कर्मचारी गैरहजर होते. कर्मचाऱ्यांकडे सुरक्षेची साधने नव्हती. महापौरांच्याच प्रभागात पाच दिवसांपासून घंटागाडी गायब असल्याची धक्कादायक बाब आढळली.
 

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com