आयुक्‍त तुकाराम मुंढे सकाळीच पोचले डम्पिंग यार्डवर, अधिकाऱ्यांची उडाली भंबेरी

पदभार हाती घेताच आयुक्‍तांनी स्वच्छतेचा मुद्दा हाती घेतला. स्चछतेच्या बाबतीत कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही, असे त्यांनी बैठकीतही आरोग्य अधिकाऱ्यांना सांगितले होते. नागरिकांना ओला आणि सुका कचरा वेगळा करायला सांगून त्याचीच उचल करा, असेही त्यांनी वारंवार सांगितले होते
Tukaram Mundhe Visited Nagpur Dumping Yard Early in the Morning
Tukaram Mundhe Visited Nagpur Dumping Yard Early in the Morning

नागपूर : नागपूर महानगरपालिकेचे आयुक्‍त तुकाराम मुंढेंनी आज सकाळी नऊ वाजताच भांडेवाडी डम्पिंग यार्ड गाठले. तेथील कचऱ्याची पाहणी केली. ओला आणि सुक्‍या कचऱ्याचा एकच ढीग रचला असल्याचे पाहून ते संतापले. त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. यावेळी अधिकारी कर्मचारी उपस्थित नसल्याने त्यांनी नाराजीही व्यक्‍त केली. असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, अशी तंबीही त्यांनी दिली. या दरम्यान अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली.

पदभार हाती घेताच आयुक्‍तांनी स्वच्छतेचा मुद्दा हाती घेतला. स्चछतेच्या बाबतीत कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही, असे त्यांनी बैठकीतही आरोग्य अधिकाऱ्यांना सांगितले होते. नागरिकांना ओला आणि सुका कचरा वेगळा करायला सांगून त्याचीच उचल करा, असेही त्यांनी वारंवार सांगितले होते. आज त्यांनी थेट नागपुरातील भांडेवाडी डम्पिंग यार्डला भेट देऊन पाहणी केली. तेथील अव्यवस्था पाहून त्यांनी नाराजी व्यक्‍त केली. 

त्यांनी कचऱ्याचे मोजमाप यंत्र तपासले. कचऱ्याचे विलगीकरण केलेले न दिसल्याने आरोग्य अधिकाऱ्यांचा समाचार घेतला. कार्यभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांनी कर्मचारी व अधिकाऱ्यांना कपड्यापासून तर दाढीपर्यंत शिस्त लावणे सुरू केले आहे. गेल्या काहीच दिवसांत त्यांच्या कार्यपद्धतीला मनपातील अधिकारी व कर्मचारी कंटाळले आहेत. त्यांच्यापासून सुटका कशी करावी, याचा विचार कर्मचारी करीत असून, एकमेकांना फोन लावणे सुरू असल्याचे समजते.

नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तुकाराम मुंढेंनी चार कर्मचाऱ्यांना दणका दिला होता. कामात अनियमितता आढळल्याने लेखा आणि वित्त विभागातील चार कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश, तुकाराम मुंढे यांनी दिले होते. तुकाराम मुंढे यांनी रुजू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी लेखा आणि वित्त विभागाची पाहणी केली होती.

...तर नागरीकांवरही कारवाई

यार्डवर कचरा डम्प करताना ओला आणि सुका कचरा वेगळा टाकणे आवश्‍यक आहे. नागरीकांकडून कचरा वेगवेगळाच संकलित करावा. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तसा आग्रह त्यांच्याकडे धरावा. नागरीक तसे करीत नसतील तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त मुंढे यांनी दिला.

अधिकारी, कर्मचारी कंटाळले

तुकाराम मुंढे यांच्या कामकाजाची पद्धत कशी आहे? त्यावर कशी मात केली? असे प्रश्‍न मनपातील कर्मचारी व अधिकारी नाशिक मनपातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना फोन करुन विचारत आहेत. यावरून गेल्या काही दिवसांत आयुक्त मुंढे यांच्या कार्यपद्धतीला मनपातील अधिकारी, कर्मचारी कंटाळल्याचे चित्र आहे.

कर्मचाऱ्यांसाठी नियमांचं पत्रक

कडक शिस्तीसाठी प्रसिद्ध असलेले नागपूरचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शिस्तीचे धडे देण्यास सुरुवात केली आहे. शहरातील अनेक चुकीच्या बाबी सुधारण्याचा विडा उचलला असतानाच, महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना वळण लावण्याचा प्रयत्न मुंढेंनी सुरू केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com