कोरोना : नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंनी लावला मेट्रो आणि आपली बसला "ब्रेक'

कोरोनावर अधिक ताकदीने प्रतिबंध लावण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काल नवीन आदेश काढला. या आदेशानुसार आजपासून सर्व व्यवासायिक वाहतूक करणारी वाहने शहर सीमेत पुढील आदेशापर्यंत बंद केली आहेत. केवळ अत्यावश्‍यक सेवेतील वाहने अर्थात धान्य, भाजीपाला, औषधी वाहतूक करणारी वाहनेच शहरात येतील.
कोरोनावर अधिक ताकदीने प्रतिबंध लावण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काल नवीन आदेश काढला.
कोरोनावर अधिक ताकदीने प्रतिबंध लावण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काल नवीन आदेश काढला.

नागपूर ः कोरोनावर अधिक ताकदीने प्रतिबंध लावण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काल नवीन आदेश काढला. या आदेशानुसार आजपासून सर्व व्यवासायिक वाहतूक करणारी वाहने शहर सीमेत पुढील आदेशापर्यंत बंद केली आहेत. केवळ अत्यावश्‍यक सेवेतील वाहने अर्थात धान्य, भाजीपाला, औषधी वाहतूक करणारी वाहनेच शहरात येतील. 

महामेट्रोने मेट्रो सेवाही आजपासून बंद केली. 50 टक्के विमानसेवाही बाधित झाली असून आजपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद करण्यात आली आहे.

कोरोनाचा वाढता प्रकोप रोखण्यासाठी महापालिका आयुक्त दररोज आढावा घेत असून परिस्थितीनुसार निर्णय घेत आहेत. त्यांनी आजपासून सर्व व्यवासायिक वाहतूक करणारी वाहने शहर सीमेत पुढील आदेशापर्यंत बंद करण्याचा आदेश काढला. कोरोना विषाणूमुळे उद्‌भवणाऱ्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण यासाठी महाराष्ट्र कोव्हीड-19 उपाययोजना नियम 2020 मधील नियमानुसार आयुक्तांनी हे आदेश काढले. या आदेशानुसार आता शहरातील अत्यावश्‍यक सेवा देणारी वाहने व जीवनावश्‍यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या सेवा वगळून इतर सर्व प्रकारच्या व्यावसायिक वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या वाहतुकीस पुढील आदेशापर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत.

शहर बससह ऑटो, ओला, उबेर व अन्य कंपन्यांच्या टॅक्‍सी, खासगी ट्रॅव्हल्स आदींना "ब्रेक' लागला आहे. दरम्यान महामेट्रो प्रशासनाने 31 मार्चपर्यंत मेट्रोच्या वर्धा मार्ग व हिंगणा मार्गावरील मेट्रो सेवा बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे कोरोनाचा विषाणू पसरू नये, यासाठी मेट्रोने हा निर्णय घेतला. काल रविवारीही मेट्रोची प्रवासी सेवा बंद होती. मेट्रो कार्यालय आणि स्टेशन येथे इंफ्रारेड थर्म मीटरद्वारे प्रवाशांचे तसेच कर्मचाऱ्यांचे थर्मल स्कॅनिंग केले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com