Tukaram Mundhe May Reduce Nashik's Tax | Sarkarnama

पालकमंत्र्यांच्या सुचनेमुळे करवाढीवर आयुक्त मुंढेंचे एक पाऊल मागे? 

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

दोन दिवसांपूर्वी शहरात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आयुक्त तुकाराम मुंढे, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, सभागृह नेते दिनकर पाटील, स्थायी समिती अध्यक्ष हिमगौरी आडके, आमदार राहूल आहेर, आमदार बाळासाहेब सानप, आमदार देवयानी फरांदे, नगरसेवक अजिंक्‍य साने, अनिल भालेराव यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. यावेळी मालमत्ता करवाढीला महापालिकेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी विरोध केला. 

नाशिक : करवाढीच्या निर्णयाने महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे आणि महापालिकेतील सत्ताधारी, विरोधकांसह शहरातील सर्वच राजकीय पक्षांतील नेत्यांमधून विस्तवही जात नाही. या निर्णयाने नागरिक पक्षावर नाराज आहेत, असे भाजपचे स्थानिक नेते पालकमंत्री गिरीश महाजन यांना पटवुन देण्यात यशस्वी झाले. पालकमंत्र्यांच्या सुचनेमुळे आयुक्त मुंढे यांनीही त्याला प्रतिसाद दिल्याचे कळते. त्यामुळे लवकरच शहरातील शेतीवरील महापालिकेचा कर मागे घेतला जाण्याची शक्‍यता आहे. 

यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी शहरात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आयुक्त तुकाराम मुंढे, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, सभागृह नेते दिनकर पाटील, स्थायी समिती अध्यक्ष हिमगौरी आडके, आमदार राहूल आहेर, आमदार बाळासाहेब सानप, आमदार देवयानी फरांदे, नगरसेवक अजिंक्‍य साने, अनिल भालेराव यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. यावेळी मालमत्ता करवाढीला महापालिकेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी विरोध केला. 

लोकांची नाराजी आहे. त्यामुळे करवाढ मागे घेण्यात यावी असा आग्रह धरला. मात्र महापालिकेचे उत्पन्न वाढले नाही तर विकासकामे करता येणार नाही. महसुलात घट होईल असे आयुक्तांनी सांगितले. त्याला एका आमदाराने दुजोरा दिला. मात्र, अन्य सगळ्यांचाच विरोध पाहता हिरव्या व पिवळ्या पट्ट्यातील शेतीवरील कर मागे घेण्याचे पालकमंत्र्यांनी सुचवले. त्यामुळे लवकरच महापालिकेची करवाढ सौम्य होण्याची शक्‍यता असल्याचे या बैठकीस उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्याने सांगीतले. त्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांना व शेतजमिनीच्या मालकांना दिलासा मिळण्याची शक्‍यता आहे. 

गिरीश महाजन

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख