Tukaram Mundhe on Long Leave | Sarkarnama

तुकाराम मुंढे पंधरा दिवसाच्या रजेवर, बदलीची नाशिकमध्ये चर्चा

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 26 मे 2018

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे पंधरा दिवसांच्या रजेवर जाणार आहेत. ही रजा पंधरा दिवसांपूर्वीच मंजुर झाली आहे. मात्र, या निमित्ताने मुंढे विरोधकांनी मात्र रजा नव्हे तर त्यांच्या बदलीचीच चर्चा महापालिका वर्तुळात पसरवली आहे. 

नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे पंधरा दिवसांच्या रजेवर जाणार आहेत. ही रजा पंधरा दिवसांपूर्वीच मंजुर झाली आहे. मात्र, या निमित्ताने मुंढे विरोधकांनी मात्र रजा नव्हे तर त्यांच्या बदलीचीच चर्चा महापालिका वर्तुळात पसरवली आहे. 

शहरात गेल्या पाच महिन्यांपासून आयुक्त मुंढे त्यांच्या धडाकेबाज कारवाई, विविध निर्णयांनी सतत चर्चेत राहिले आहेत. प्रशासकीय कामकाजाची कार्यपध्दती, जलद निर्णय व कार्यवाहीसाठी आठवड्याला आढावा यांमुळे सबंध प्रशासन एकीकडे अॅक्टीव्ह तर दुसरीकडे दबावात आहे. सिडकोतील अनधिकृत घरे तोडण्याचा निर्णय घेतल्याने तेथील नागरिक संतप्त झाले आहेत.

सिडको बचाव संघर्ष समिती स्थापन करून आयुक्तांविरोधात भूमिका घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. भाजप नगरसेवकांकडूनही थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत मुंढे यांच्याविरोधात तक्रारी केल्याचे बोलले जाते. विशेषतः करवाढीच्या निर्णयामुळे आयुक्त मुंढे आणि लोकप्रतिनिधींत दरी आहे. थेट मुख्यमंत्र्यांनी स्मार्ट सिटी आणि परिवहन सेवा सुरु करण्याचे टास्क देऊन मुंढे यांना नाशिकला नियुक्त केले आहे. आता ते दीर्घ रजेवर जाणार असल्याने ही बदलीची चर्चा सुरु झाली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख