Tukaram Mundhe Girish Mahajan Helped accident victims | Sarkarnama

पालकमंत्री गिरीश महाजन, आयुक्त तुकाराम मुंढे जखमींच्या मदतीसाठी ढिगा-यात शिरले! 

सरकारनामा ब्युरो 
रविवार, 5 ऑगस्ट 2018

आज दुपारी एकला शहरातील जुनी तांबट आळी येथील काळे वाडा ही जुनी इमारत कोसळली. देखभाल नसल्याने जुने बांधकाम असलेलली ही इमारत कोसळली. त्यात काळे यांचे एक कुटुंब रहात होते. उर्वरीत भाग रिकामा होता. महापालिकेने इमारतीला धोकादायक म्हणुन नोटीस देण्यात आली होती.

नाशिक : शहरातील तांबट लेनमधील जुनी इमारत आज कोसळली. यावेळी नियोजन मंडळाची बैठक सुरु होती. इमारत कोसळल्याची माहिती मिळताच बैठक संपवून पालकमंत्री गिरीश महाजन आणि महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे दोघेही सहकाऱ्यांसह घटनास्थळी गेले. त्यांनी थेट ढिगाऱ्यात शिरुन जखमींना बाहेर काढण्यासाठी मदत केली. एका महिलेला तर स्ट्रेचरवर टाकुन त्यांनी बाहेर काढले. एक नेता अन्‌ एक प्रशासक दोघांनीही चाकोरीबाहेर जाऊन केलेल्या मदतीमुळे नागरिकांनी त्यांचे कौतुक केले. 

आज दुपारी एकला शहरातील जुनी तांबट आळी येथील काळे वाडा ही जुनी इमारत कोसळली. देखभाल नसल्याने जुने बांधकाम असलेलली ही इमारत कोसळली. त्यात काळे यांचे एक कुटुंब रहात होते. उर्वरीत भाग रिकामा होता. महापालिकेने इमारतीला धोकादायक म्हणुन नोटीस देण्यात आली होती. इमारत पडल्यावर ढिगाऱ्याखाली अडकून करण घोडके ही व्यक्ती ठार झाली. तर काळे कुटुंबातील काजल, संजय, समर्थ आणि चेतन पवार हे ढिगाऱ्यात अडकले. 

ही माहिती समजताच नियोजन समितीची इमारत कोसळल्याची माहिती मिळताच पालकमंत्री महाजन, आयुक्त तुकाराम मुंढे यांसह वाहनांचा ताफा घटनास्थळी गेला. यावेळी अग्निशमन दलाच्या पथकाला मदतीसाठी पालकमंत्री महाजन आणि आयुक्त मुंढे थेट ढिगाऱ्यात गेले. त्यांनी काजल काळे हिला मदत करीत स्ट्रेचरवर घालून बाहेर काढले. अन्य जखमीनांही धीर देत बाहेर काढले. यावेळी पालकमंत्री आणि आयुक्तांची ही धडाडी पाहून नागरीकांनी त्यांचे कौतुक केले. जिल्हाधिकारी बी राधाकृष्णन, पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, आमदार देवयानी फरांदे यांसह विविध पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांनीही घटनास्थळी भेट दिली. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख