नागपूर महानगरपालिकेत मुंढे इफेक्‍ट : साडेनऊच्या ठोक्‍याला कर्मचारी हजर

तुकाराम मुंढे शिस्तीचे पक्के आहेत. थोडाही कामचुकारपणा ते खपवून घेत नाही. रुजू झाले तेव्हापासूनच त्यांनी कर्मचाऱ्यांना तंबी देणे सुरू केले. काहींना निलंबित केले. त्यामुळे कर्मचारी चांगलेच धास्तावले आहेत
Tukaram Munde Effect Working in Nagpur Corporation
Tukaram Munde Effect Working in Nagpur Corporation

नागपूर : केंव्हाही यावे आणि वाटेल तेव्हा जावे, या महापालिका कर्मचाऱ्यांच्या वृत्तीत तुकाराम मुंढे आयुक्त म्हणून रुजू झाल्यानंतर आता बदल झाला आहे. यापूर्वी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती सरासरी साठ टक्के असायची. त्यात आश्‍चर्यकारक फरक पडला आहे. आता उपस्थिती चक्क शंभर टक्के झाली आहे.

तुकाराम मुंढे शिस्तीचे पक्के आहेत. थोडाही कामचुकारपणा ते खपवून घेत नाही. रुजू झाले तेव्हापासूनच त्यांनी कर्मचाऱ्यांना तंबी देणे सुरू केले. काहींना निलंबित केले. त्यामुळे कर्मचारी चांगलेच धास्तावले आहेत. कार्यालयात फॉर्मल ड्रेस घालून आणि रोज दाढी करुन येणे बंधनकारक केले आहे. जीन्स पॅंट व टी शर्ट घालून येण्यास बंदी घातली आहे. जयंती, पुण्यतिथीच्या कार्यक्रमांनाही येणे बंधनकारक केले आहे. 

जीन्स घालून आलेल्या कर्मचाऱ्यांना 'माझ्याकडेही महागड्या जीन्स आहेत', असे सांगून त्यांनी चांगलीच खरडपट्टी काढली होती. कपडे घालायची हौस बाहेर भागवा, मात्र कार्यालयात येताना फॉर्मल ड्रेसच घाला. "तुमचे समाजातील स्टेट्‌स जीन्स घातली म्हणून नाही तर महापालिकेचे कर्मचारी म्हणून आहे'', असेही ते म्हणाले होते. त्यामुळे कर्मचारी चांगलेच धास्तावले आहेत.

मुंढे यांनी 28 जानेवारीला सूत्रे स्वीकारली. त्यापूर्वी 23 जानेवारीपर्यंत मनपा मुख्यालयात विविध विभागात उशिरा येणारे आणि अनुपस्थित राहणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची सरासरी 41 टक्के होती. आता सरासरी 96 टक्के झाली आहे. बायोमेट्रिक मशीनच्या माध्यमातून हजेरी लावावी. याचा सकारात्मक परिणाम कर्मचाऱ्यांवर झाल्याचे सध्या असलेल्या उपस्थितीवरून लक्षात येत आहे. 14 फेब्रुवारी रोजी सामान्य प्रशासन विभाग, आरोग्य (दवाखाने), ग्रंथालय, समाजकल्याण, कर आकारणी विभाग, जलप्रदाय विभागातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती 100 टक्के होती. शिक्षण, प्रकाश, स्थावर, उद्यान, आरोग्य (स्वच्छता), एलबीटी, लोककर्म, स्लम, नगररचना या विभागामध्ये 95 ते 99 टक्के उपस्थिती आहे. अन्य विभागातीलही कर्मचाऱ्यांची उपस्थिती 90 टक्‍क्‍यांच्यावर असून सरासरी 96 टक्के इतकी आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com