परफॉर्म ऑर पेरिश : मुंडे
पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून सुत्रे हाती घेतल्यानंतर तुकाराम मुंडे यांनी प्रामाणिक आणि स्वच्छ कारभाराची हमी देत कामात सुधारणा करा अथवा शिक्षेला सामोरे जा असा इशारा दिला आहे.
पुणे : पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून सुत्रे हाती घेतल्यानंतर तुकाराम मुंडे यांनी प्रामाणिक आणि स्वच्छ कारभाराची हमी देत कामात सुधारणा करा अथवा शिक्षेला सामोरे जा असा इशारा दिला आहे.
प्रशासनातील अधिकारी , कर्मचारी तसेच कामगार संघटनांच्या प्रतिनिधिनी आज त्यांचे स्वागत केले. यावेळी आमच्याकडून चांगले काम होत असल्याचा दावा सर्वावनीच केला. त्यावर सारेच चांगले काम करीत असतानाही कंपनी तोट्यात कशी, असा प्रश्न मुंडे यांनी केला. चांगले काम करणाऱ्याला प्रोत्साहन मिळेल. मात्र कामचुकारांची गय केली जाणार नाही, असा इशारा मुंडे यांनी दिला. आपण केव्हाही कोणत्याही डेपोमध्ये जाऊन तपासणी करु, असेही मुंडे यांनी यावेळी बजावले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंडे यांनी आधिकारी व सर्व विभागप्रमुखांची सलग पाच तास नॉनस्टॉप बैठक घेतली. पीएमपीचे ठराविक मार्गच कसे तोट्यात येतात असा प्रश्न त्यांनी विचारला. या विषयावरुन आधिकाऱ्यांची खरडपट्टी केली. कार्यालयीन वेळेतही तातडीने बदल करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. सध्या 10.30 ते 5. 30 अशी वेळ होती. मात्र नियमप्रमाणे आठ तास काम होणे अपेक्षित आहे. त्यामुळे यापुढे सकाळी 9.45 ते 5.45 अशी कामकाजाची वेळ राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

