tukaram munde nashik mayor | Sarkarnama

नाशिकच्या महापौरांनी रद्द केले तुकाराम मुंडेंचे सर्व निर्णय 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 19 डिसेंबर 2018

नाशिक : तुकाराम मुंडे यांनी आयुक्त म्हणुन कारभार हाती घेतल्यावर काटकसर आणि अनावश्‍यक कामांना कात्री लावुन महापालिका सुरळीत केली. मात्र त्यांच्या बदलीनंतर झालेल्या पहिल्या महासभेत आज महापौर रंजना भानसी यांनी त्यांचे सर्व निर्णय फिरवत रद्द केले.

तसेच 350 कोटींची कामे अंदाजपत्रकात धरण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने नगरसेवकांसाठी आजचा दिवस दिवाळी ठरला. 

नवनियुक्त आयुक्त राधाकृष्ण गमे यांचे आज झालेल्या महासभेत स्वागत करण्यात आले. त्यासाठी सर्वच पक्षांचे नेते एकत्र आले होते. त्यानंतर महासभेत विविध विषयांवर चर्चा झाली. त्यात नगरसेवक, गटनेत्यांनी करवाढीसह, घरपट्टीच्या फेरआकारणीवर प्रश्‍न उपस्थित केला. त्यानंतर महापौरांनी आयुक्त म्हणुन मुंडे यांनी घेतलेले सर्व निर्णय रद्द करण्यात यावेत.

मुंडे यांनी अनधिकृत ठरविलेल्या दोन लाख 79 हजार मिळकतींचा निर्णय रद्द केला. अनधिकृत ठरविलेल्या मिळकतींचे फेरसर्व्हेक्षणकरण्याची सुचना प्रशासनाला दिली. नागरीकांना घरपट्टी व अनधिकृत मिळकतींसंदर्भात दिलेल्या नोटीस रद्द करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. 

विशेष म्हणजे अनावश्‍यक व संशयास्पद वाटल्याने रद्द केलेल्या 350 कोटींची कामे पुन्हा अंदाजपत्रकात घेऊन त्यासाठी तरतूद करण्यात येईल. त्यामुळे संशयास्पद कामांना ही मंजुरीच असल्याने नगरसेवकांसाठी आजचा दिवस दिवाळीच ठरला. त्यामुळे मुंडे यांनी आर्थिक अडचणीत सापडलेल्या महापालिकेची गाडी रुळावर आणत महसुल वाढीसाठी घेतलेल्या करवाढीला स्थगिती मिळाली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख