तुकाराम मुंडे दोन आठवड्यानंतर महापौरांना भेटले 

 तुकाराम मुंडे दोन आठवड्यानंतर महापौरांना भेटले 

नागपूर : दोन आठवड्याच्या प्रतीक्षेनंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज महापौर संदीप जोशी यांची अनौपचारीक भेट घेतली. या भेटीकडे अनेकांचे लक्ष लागून होते. आयुक्तांनी महापौरांची भेट घ्यावी, असा शिष्टाचार असताना मनपातील या दोन प्रमुखांची भेट झाली नव्हती. 

काल दुपारी सुमारे 15 ते 20 मिनीटांची भेट झाली. त्यात शहरातील विविध समस्या व प्रकल्पावर चर्चा झाली. 

आयुक्त तुकाराम मुंढे 28 जानेवारीला मनपात रूजू झाले. पदग्रहणानंतर आयुक्त थेट मेट्रो रेल्वेच्या ऍक्वा लाईनच्या लोकार्पण सोहळयात महापौरांशी केवळ हस्तांदोलन झाले होते. त्यानंतर महापौर मुंबईत असताना आयुक्त नागपुरात होते. महापौर नागपुरात परतल्यानंतर आयुक्त बैठकीसाठी मुंबईत होते. मधल्या काळात आयुक्त व महापौर दोघेही नागपुरात असताना ही भेट होत नव्हती. त्यामुळे उलटसुलट बातम्या येत राहील्या. 

आयुक्तांनी महापौरांची भेट घ्यावीच, यासाठी नगरसेवकांकडून पाठपुरावा केला जात होता. तर, महापौर हे आयुक्तांशी मोबाईलवर चर्चा झाल्याचे सांगत होते. परंतु, दरम्यानच्या काळात आयुक्त मुंढे यांनी कामाचा सपाटा लावला होता. स्वत: जनता दरबारही सुरू केला होता. या दरबाराला नागपूरकरांनी मोठी गर्दी केली होती. 

याच काळात महापौरांचाही जनता दरबार सुरू होता. त्यामुळे पुन्हा वेगवेगळया चर्चांना उधाण आले होते. अखेर काल या दोघांच्याही भेटीनंतर विविध चर्चा व तर्कवितर्कांना विराम मिळाला आहे.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com