विखे पाटलांच्या नाशिकमधील गोदामात भरणाऱ्या शाळेला तुकाराम मुंढेंचा दणका

विखे पाटलांच्या नाशिकमधील गोदामात भरणाऱ्या शाळेला तुकाराम मुंढेंचा दणका

नाशिक : राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी संबंधीत विखे पाटील फाउंडेशनच्या शाळेचे अनधिकृत बांधकाम पाडण्याची नोटीस महापालिकेने बजावली आहे. गोदामात भरणाऱ्या या शाळेवरील कारवाईने येथील अनेक प्रस्थापितांना दणका बसला आहे. अनधिकृत बांधकामांविरोधातील आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचा आता सगळ्यांनीच धसका घेतला आहे. 

पुण्यातील विखे पाटील फाउंडेशनच्या सिडकोतील अंबड लिंक रोडवर डीजीपीनगर क्रमांक दोनमध्ये विखे पाटील मेमोरिअल शाळेने 2002 मध्ये बांधकाम केल्यानंतर बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळविला. 2012 मध्ये आणखी काही बांधकाम केल्यानंतर त्याचाही दाखला घेतला. त्यानंतर शाळेने आणखी बांधकाम केले; परंतु अतिरिक्त बांधकाम पूर्णत्वाचा दाखला न घेतल्याने शासनाच्या कंपाउंडिंग पॉलिसींतर्गत अतिरिक्त बांधकाम नियमित करून घेण्यासाठी प्रस्ताव दाखल केला. पॉलिसीला 31 डिसेंबर 2018 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. मुदतवाढीपूर्वी दोन हजार 933 प्रस्ताव दाखल झाले. अद्यापही प्रस्ताव दाखल होत असताना महापालिकेने दोन हजार 933 पैकी विखे पाटील शाळेच्याच प्रस्तावाची छाननी करून प्रस्ताव नामंजूर केल्याचा प्रकार शाळेच्या अधिकाऱ्यांनी वास्तुविशारद विजय सानप यांच्यासह महापौर रंजना भानसी यांच्याकडे धाव घेतल्यानंतर समोर आला. 

शाळेचा बांधकाम नकाशा व भोगवटा परवानगीच्या नकाशात गोदाम दाखविले आहे, परंतु कंपाउंडिंग पॉलिसींतर्गत दाखल प्रस्तावात तळघर दर्शविले. वास्तुविशारद हृषीकेश पवार यांनी प्रस्ताव दाखल केला; परंतु नकाशावर वृषाली प्रधान यांचे नाव आहे. प्रस्तावावर स्वाक्षरी नाही, शुल्काबाबत उल्लेख नाही. शाळेच्या पाहणीनंतर तळघराचा अनधिकृत वापर होत असल्याचे आढळले. तसेच नियमानुसार प्रस्ताव सादर नसल्याने प्रस्ताव नामंजूर केल्याचा खुलासा नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी महापौरांसमोर केल्याचा आरोप वास्तुविशारद विजय सानप यांनी केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com