तुकाराम मुंढेंना पुणे महापालिकेचे आयुक्त म्हणून आणणार : भाजपच्या विरोधात खेळी

..
तुकाराम मुंढेंना पुणे महापालिकेचे आयुक्त म्हणून आणणार : भाजपच्या विरोधात खेळी

पुणे : राज्यात भारतीय जनता पक्षाच्या सरकारचा पाडाव झाल्यानंतर या पक्षाची सत्ता असलेल्या महापालिकांत आपल्या मर्जीतील वरिष्ठ अधिकारी नेमण्याचा अजेंडा नव्या आघाडी सरकारने आखला आहे. भाजपचे स्वबळ असलेल्या पुणे महापालिकेत प्रशासकीय हुकूमत करण्याच्या चातुर्याने सनदी अधिकारी  तुकाराम मुंढे यांची आयुक्तपदावर नेमणूक करण्याच्या हालचाली राज्य सरकार करीत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

परिणामी, आयुक्त सौरभ यांची यांची पुढील काही दिवस बदली होऊन त्यांच्याजागी मुंढेंची नेमणूक होण्याची शक्‍यता आहे. राज्य सरकारांकडून नेहमीच आपल्या सोयीच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करून प्रशासनावर वर्चस्वर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. राज्यात देवेंद्र फडणवीसांचे सरकार येताच 2009 मध्ये मंत्रालयासह काही ठिकाणचे वरिष्ठ अधिकारी बदलण्यात आले होते. त्यातूनही आपल्या विरोधकांवर मात करण्याची संधी या सरकारने साधल्याचे बोलले जाते. परंतु, सत्तांतर होताच शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस आघाडीनेही अधिकारी बदलण्याचा जुनाच कित्ता गिरवला असून, विशेषत: ज्या महापालिकांत भाजपची सत्ता आहे, अशा ठिकाणीही प्रशासकीय दरारा ठेवण्याची रणनीती आखल्याचे सांगण्यात येत आहे.

या पार्श्‍वभूमीवर आपापली राजकीय आणि प्रशासकीय ताकद पुन्हा वाढविण्याच्या उद्देशाने शिवसेनेसह राष्ट्रवादीनेही पुण्यात लक्ष घातले असून, फडणवीस सरकारच्या काळात नेमणूक झालेल्या आयुक्त राव यांच्यासह राज्य सरकारमधून प्रतिनियुक्तीवर आलेल्या काही वरिष्ठ अधिकाऱ्याच्या बदल केल्या जाण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, राव यांच्या कार्यकाळ पूर्ण झालेला नाही, मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या बदलीची चर्चा आहे.

पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत मुंढे यांनी काम केले आहे. कर्तव्यनिष्ठ अधिकारी अशी ओळख असलेल्या डॉ. मुंढे यांनी राजकारण्यांविरोधात जाऊन अनेक निर्णय घेतले. "पीएमपी'च्या कारभारात नव्या बदलाचे निर्णय घेत त्यांनी आपल्या स्टाइलने सत्ताधारी भाजपला नाकीनऊ आणले होते. त्यावरून सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी आणि मुंढे यांच्यात अनेकदा खडाजंगीही झाली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com