truth is like the sun : CM on rafel | Sarkarnama

राफेलचे सत्य तळपत्या सूर्यासारखे : मुख्यमंत्री

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

पुणे : सर्वोच्च न्यायालयाने राफेल विमानांच्या व्यवहारात गैरप्रकार नसल्याचा निर्वाळा दिल्यानंतर भाजप नेते आक्रमक झाले आहेत. सत्य हे नेहमीच तळपत्या सूर्यासारखे असते, अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

``राफेल प्रकरणात कोणत्याही चौकशीची गरज नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने आमची (भाजपची) भूमिकाच या निकालातून अधोरेखित झाली आहे. देशाच्या सुरक्षेशी तडजोड केल्याबद्दल आणि भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनामी केल्याबद्दल आता काँग्रेस पक्ष आणि त्यांचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी माफी मागितली पाहिजे,`` अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.

राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाचा खोटारडेपणा उघडकीस आला असून, त्यांनी संपूर्ण देशात राफेलबाबत भ्रामक प्रचारतंत्र राबविले. संसदेचा बहुमूल्य वेळ वाया घालविला आणि नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांदरम्यान सुद्धा जनतेची दिशाभूल केली. काँग्रेस पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची सुद्धा माफी मागितली पाहिजे, अशीही मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख