तृप्ती देसाई यांचा तो व्हीडीओ दारूबंदी आंदोलनातील.. - trupti desai vdo viral in social media is about liquor ban agitation | Politics Marathi News - Sarkarnama

तृप्ती देसाई यांचा तो व्हीडीओ दारूबंदी आंदोलनातील..

महेश जगताप
गुरुवार, 2 एप्रिल 2020

संचारबंदीच्या काळात जुने व्हिडीओ काढून काहींची बदनामी करण्याचे तंत्र सुरू करण्यात आले आहे. अशा चुकीच्या बाबींना वेळीच आळा बसायला हवा. 

पुणे : भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांना लॉकडाउनच्या काळात दारू घेताना अटक करण्यात आले, असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर झाला आहे. तृप्ती देसाई यांच्याशी चर्चा केल्यानंतर अशी कोणतीही घटना झाली नाही जुने व्हिडिओ काढून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न चालू आहे असे त्यांनी सांगितले.

सोशल मीडियावर देसाई यांचा  अटक करतानाचा फिरत असलेला व्हिडिओ आहे. ``महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस  महाजनादेश यात्रेवेळी पुण्यात आले असता दारूबंदी कायदा करावा या मागणीसाठी मी दारूच्या रिकाम्या बाटलीचा हार त्यांच्या गळ्यात घालणार होते. पण पोलिसांनी असा प्रकार घडण्याआधी माझ्या ऑफिसमधून मला ताब्यात घेतले. फडणवीस जाईपर्यंत मला ठेवण्यात आले होते,असे देसाई यांनी या व्होडिओबद्दल माहिती दिली .

काही समाजकंटक देशभरात वेगवेगळ्या राज्यात माझ्या नावाने अटक झाली म्हणून हे व्होडिओ व्हायरल करीत आहेत. तरीही मी या प्रकाराला भीक घालत नाही. विचारांची लढाई विचाराने लढायची असते, असे देसाई यांनी सांगीतले व मी यांच्यावर सायबर क्राईममध्ये जाऊन गुन्हा नोंद करणार  आहे, असेही त्या म्हणाल्या. मी गेली अनेक वर्षे दारूबंदीवर काम करीत आहे .त्यामुळे मला बदनाम करण्याचा प्रयत्न चालू आहे, असा आरोप त्यांनी केला .
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख