`कोरोनाने एक लाख लोकांचा मृत्यू झाला तरी ती माझी चांगली कामगिरी`

डोनाल्ड ट्रम्प यांची विधाने ऐकून अनेकांना धक्का बसला आहे.
trump
trump

न्यूयॉर्क : "कोरोनाच्या महासंकटात माझ्या प्रशासनाने मृतांची संख्या एक लाखावर ठेवली तरी ते खूप मोठे काम झाले असे मी म्हणेन, हे हताश विधान दुसऱ्या तिसऱ्या कोणाचे नसून बलाढ्य अशा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आहेत. कोरोनामुळे संपूर्ण अमेरिका आज भयाच्या सावटाखाली आहे. आतापर्यंत अमेरिकेत एक लाखाहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून 2400 हून अधिक लोक कोरोनाची शिकार बनले आहेत.

अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसच्या रोझ गार्डनमधून देशातील जनतेशी संवाद साधला. जर देशात सोशल डिस्टन्सिंग किंवा इतर उपाययोजना केल्या नसत्या तर बावीस लाख लोक मरण्याचा धोका होता. आता मात्र माझे प्रशासन चांगले काम करत आहेत. या पार्श्वभूमीवर एक लाख लोक मेले तरी माझ्या प्रशासनाने चांगले काम केले, असे मला म्हणावे लागेल.

कोरोनाच्या संकटाने ट्रम्प हे चिंताक्रांत दिसत होते. ते म्हणाले, की अमेरिकेवर आलेले संकट मोठे आहे. लोकांचे प्राण वाचविताना प्रशासनाची कसोटी लागत आहे. अर्थव्यवस्थेला धक्का बसण्याची शक्‍यता आहे. प्रत्येक अमेरिकन माणसाच्या जिविताचे रक्षण करणे माझे कर्तव्यच आहे, अशीही पुस्ती त्यांनी जोडली.

अऩेक वादग्रस्त आणि चक्रावणारी विधाने त्यांनी या भाषणात केली. अमेरिकेतील शटडाऊन त्यांनी आणखी पंधरा दिवसांनी लांबविण्याचा निर्णय जाहीर केला. तसेच या महामारीचा वाईट तडाखा आपल्याला बसायचा आहे, असाही इशारा त्यांनी दिला. या कोरोनावर विजय मिळविण्याचा आधीचा ट्रम्प यांचा आशावाद या भाषणात दिसला नाही. अर्थव्यवस्थेचे चक्र ईस्टरपासून सुरू करण्याचा त्यांचा मनोदयही आता धुळीस मिळाल्याचे या भाषणात दिसून आला. या भाषणात त्यांनी पत्रकारांवर नेहमीप्रमाणे हल्ला केली आणि आरोग्य सेवेतील कर्मचारी मास्क चोरत असल्याचा बिनबुडाचा आरोपही त्यांनी केला.

सर्वाधिक मृत्यू पडण्याचे प्रमाण येत्या दोन आठवड्यांत दिसून येईल, असेही त्यांनी सांगितले. आतापर्यंत 2400 लोक या कोरोनामुळे अमेरिकेत मृत्यू पडले आहेत. जूनपासून परिस्थिती सुधारेल, असेही त्यांनी सांगितले. सुरवातीला या साथीविषयी निष्काळजीणा दाखविणाऱ्या ट्रम्प यांनी आता त्याउलटा भीतीदायक विधाने केल्याने त्याविरोधात आता मते व्यक्त होत आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com