कोरोनाबाधितांना वाचवण्यासाठी ट्रम्प यांचा अघोरी सल्ला; एेकू नका : वैद्यकीय तज्ज्ञ 

निर्जंतुकीकरणाचे इंजेक्शन देऊन कोरोनाबाधित रुग्णाचे पूर्ण शरीरच निर्जंतुक करा किंवा रुग्णाच्या शरीरावर अतिनील किरणांचा मारा करून विषाणू मारून टाका, असा अघोरी सल्ला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.
Trump now suggests injecting disinfectants, bringing UV light 'inside the body' to kill coronavirus 
Trump now suggests injecting disinfectants, bringing UV light 'inside the body' to kill coronavirus 

न्यूयॉर्क : निर्जंतुकीकरणाचे इंजेक्शन देऊन कोरोनाबाधित रुग्णाचे पूर्ण शरीरच निर्जंतुक करा किंवा रुग्णाच्या शरीरावर अतिनील किरणांचा मारा करून विषाणू मारून टाका, असा अघोरी सल्ला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. 

अमेरिकेतील दिग्गज वैद्यकीय संशोधकांसमोर ट्रम्प यांनी हा प्रस्ताव मांडल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. ट्रम्प यांच्या या अघोरी सल्ल्यानंतर जगभरातील वैद्यकीय समुदाय त्यांच्यावर भडकला आहे. 

सर्वसामान्यपणे निर्जंतुकीकरणासाठी वापरली जाणारी औषधे ही मानवी शरीरासाठी धोकादायक असल्याने ती इंजेक्शनद्वारे शरीरामध्ये सोडता येत नाहीत, याशिवाय, त्वचा, डोळे यांच्यासाठी देखील घातक असल्याचे स्पष्ट झाले आहे असे असताना ट्रम्प अशा बेजबाबदार सूचना कशा काय करू शकतात, असा सवाल त्यांच्याकडून केला जात आहे. 

कोरोना विषाणूच्या जीवघेण्या संसर्गाला रोखण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ आणि वैद्यकीय संशोधक अहोरात्र मेहनत घेत असताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मात्र काही विचित्र सल्ले दिल्याने ते संशोधक आणि अभ्यासकांच्या टीकेचे लक्ष्य ठरले आहेत.  

संशोधकांचे सादरीकरण 
व्हाईट हाउसमध्ये गुरूवारी कोरोना विषाणूच्या संसर्गाचा सामना करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कृतीपथकाने सादरीकरण केले. यावेळी काही संशोधकांनी कोरोनाचा विषाणू तीव्र स्वरूपाचा सूर्यप्रकाश आणि उष्णतेच्या संपर्कात येताच कमकुवत होत असल्याचा दावा केला. या संशोधनामध्ये ब्लिचिंग पावडर आणि आयसोप्रोपाईल अल्कोहोल कोरोनाच्या विषाणूला नष्ट करत असल्याचे उघड झाल्याचे संशोधकांनी सांगितले. अमेरिकेच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संचालनालयाचे प्रमुख विल्यम ब्रायन यांनी हे सादरीकरण केल्यानंतर ट्रम्प यांनी काही सूचना मांडल्या, यानंतर ट्रम्प यांनी उपरोक्त सूचना केल्या. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com