अंजू घोष यांचा भाजपप्रवेश वादात; नागरिकत्वाला तृणमूल कॉंग्रेसचा आक्षेप  श्‍यामल रॉय 

अंजू घोष यांचा राजकारणप्रवेश वादग्रस्त ठरला आहे. त्या भारतीय असल्याचा भाजपचा दावा असला, तरी त्यांच्या कागदपत्रांमध्ये अनेक विसंगती आढळल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. अंजू घोष भारतीय असल्याचे सिद्ध करण्यासाठी भाजपने त्यांचा जन्मदाखला, मतदार ओळखपत्र आणि पारपत्र ही कागदपत्रे सादर केली आहेत.
अंजू घोष यांचा भाजपप्रवेश वादात; नागरिकत्वाला तृणमूल कॉंग्रेसचा आक्षेप  श्‍यामल रॉय 

कोलकता : बंगाली अभिनेत्री अंजू घोष यांच्या भाजपप्रवेशावरून पश्‍चिम बंगालमध्ये राजकारण सुरू झाले आहे. अंजू घोष या बांगलादेशी असल्याचा दावा करत त्यांच्या नागरिकत्वाचा मुद्दा तृणमूल कॉंग्रेसने उपस्थित केला आहे, तर अंजू घोष पूर्णपणे भारतीय असल्याचे सांगत भाजपने त्याबाबतचे पुरावे सादर केले आहेत. 

अंजू घोष यांचा राजकारणप्रवेश वादग्रस्त ठरला आहे. त्या भारतीय असल्याचा भाजपचा दावा असला, तरी त्यांच्या कागदपत्रांमध्ये अनेक विसंगती आढळल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. अंजू घोष भारतीय असल्याचे सिद्ध करण्यासाठी भाजपने त्यांचा जन्मदाखला, मतदार ओळखपत्र आणि पारपत्र ही कागदपत्रे सादर केली आहेत. कोलकत्यातील एका खासगी रुग्णालयात 1966 मध्ये आपला जन्म झाल्याचा अंजू घोष यांचा दावा आहे. त्याच्या समर्थनार्थ कोलकता महानगरपालिकेचा 2003 मधील जन्मदाखला भाजपने सादर केला आहे. मात्र, जन्म 1966 चा असताना त्याचा दाखला 2003 मध्ये कसा दिला गेला, असा प्रश्‍न आता उपस्थित झाला आहे. 

बांगलादेश आपली मातृभूमी असल्याचे विधान अंजू घोष यांनी केल्याचे वृत्त बांगलादेशातील काही वृत्तपत्रांनी छापले आहे. एका वृत्तपत्राने अंजू घोष यांचे जन्मस्थळ बांगलादेशातील चितगाव असल्याचे छापले होते. पण मी फरिदपूरमध्ये जन्मल्याचे अंजू घोष यांनी म्हटले आहे आणि ही दोन्ही शहरे बांगलादेशात आहेत. भारतीय आणि बांगलादेशी चित्रपटांत अनेक वर्षे काम करीत असूनही अंजू घोष यांना 2018 मध्ये पारपत्र देण्यात आले. हे त्यांचे शेवटचे पारपत्र असल्याचे भाजपचे म्हणणे असले, तरी आधीच्या पारपत्रांचे काय, हा प्रश्‍न राहतोच. अंजू घोष यांचे मतदार ओळखपत्र 2002 मधील असल्याने त्या एवढ्या उशिरा मतदार कशा झाल्या, हाही प्रश्‍न आहे. 

दिलीप घोष यांचा दावा 
भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्या म्हणण्यानुसार, 1950-1960 या काळात जन्मलेल्यांचे जन्मदाखले नाहीत. मात्र, आवश्‍यक ती कागदपत्रे सादर केल्यावर त्यांना कोलकाता महानगरपालिकेकडून हे दाखले देण्यात आले आहेत. अंजू घोष यांच्यासंदर्भात हेच घडले आहे. त्यात वादग्रस्त काही नाही. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com