साहेब आमच्या वाहनांचे भाडे द्यायला सांगा... चालकांची कैफियत; लोकसभा निवडणुकीसाठी घेतली होती वाहने 

साहेब आमच्या वाहनांचे भाडे द्यायला सांगा... चालकांची कैफियत; लोकसभा निवडणुकीसाठी घेतली होती वाहने 

लोकसभा निवडणुकीसाठी वाहतूक विभागाने दिलेल्या सुचनेनूसार मतदान यंत्र वाहतुकीसह इतर कामासाठी ट्रक, टॅम्पो तसेच चारचाकी वाहने भाडे तत्वावर दिली होती. जिल्ह्यातील अशा 180 हून अधिक वाहनांचे लाखो रुपयांचे भाडे थकीत आहे.

कोल्हापूर : लोकसभेसाठी मतदार आणि मतमोजणी होवून दीड महिना झाला तरीही वाहतुकीसाठी आम्ही दिलेल्या ट्रक, टॅम्पोसह चारचाकी वाहनांचे भाडे अद्यापही दिलेले नाही. निवडणूक अधिकाऱ्यांकडे वारंवार मागणी करूनही त्यांनी आमची दखल घेतलेली नाही. याच वाहनांचे हप्ते थकले आहेत म्हणून बॅंकांनी आमची वाहने जप्त केली आहेत. पोलीसही फोन करत आहेत. साहेब आता तुम्हीच निवडणूक अधिकाऱ्यांना सांगून आमचे पैसे द्यायला सांगा, अशी मागणी ट्रक, टॅंम्पो व चारचाकी वाहनधारकांनी जिल्ह्याचे पालक सचिव राजगोपाल देवरा यांच्याकडे आज केली. 

जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठक आटोपून देवरा शासकीय विश्रामगृहाकडे जाणार होते. यावेळी, जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेरच लॉरी ऑपरेटर्सचे सुभाष जाधव यांच्यासह ट्रक, टॅम्पो आणि कार चालकांनी देवरा यांच्याकडे आपली कैफियत मांडली. लोकसभा निवडणुकीसाठी वाहतूक विभागाने दिलेल्या सुचनेनूसार मतदान यंत्र वाहतुकीसह इतर कामासाठी ट्रक, टॅम्पो तसेच चारचाकी वाहने भाडे तत्वावर दिली होती. नागाव येथील उत्तम चव्हाण यांनीही आपली वाहने निवडणुकीच्या कामासाठी दिली होती. त्यांचे सुमारे 70 हजारहून अधिक भाडे द्यावे लागते. 

वारंवार मागणी करूनही निवडणूक विभागाने याकडे लक्ष दिले नाही. निवडणूक उपजिल्हाधिकारी धुमाळ यांच्याकडेही पाचारण केले तरीही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे देवरा यांनी सांगितले. जिल्ह्यातील अशा 180 हून अधिक वाहनांचे लाखो रुपयांचे भाडे थकीत आहे. लोकांनी कर्ज काढून ही वाहने घेतली आहेत. त्यांचे महिन्याला हप्ते द्यावे लागतात. हप्ते दिले नाहीत म्हणून बॅंकांनी आमची वाहने जप्त केली आहेत. हे सांगूनही निवडणूक विभाग याकडे लक्ष देत नाही. यावर, देवरा यांनी निवडणूक विभागाशी मी स्वत: बोलतो आणि तुमच्या वाहनांचे जे काही भाडे असेल ते तत्काळ द्याला सांगतो,  असे सांगून त्यांनी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनाही या प्रकरणाकडे लक्ष देण्याच्या सूचना दिल्या. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com