राज्यातील वरिष्ठ 17 अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्यातील वरिष्ठ 17 अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्यातील आयएएस दर्जाच्या 17 अधिकाऱ्यांच्या सोमवारी बदल्या करण्यात आल्या. त्यात वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, पशुसंवर्धन दुग्ध विकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव आबासाहेब जराड, सहकार आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांचा समावेश आहे. 

गेल्या अडीच वर्षात राजगोपाल देवरा यांची पाच वेळा बदली झाली असून आता त्यांची मंत्रालयातील राजशिष्टाचार विभागाचे प्रधान सचिव म्हणून बदली झाली आहे. उद्योग संचालनालयाचे आयुक्त विजय सिंघल यांची मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त या पदावर बदली झाली आहे. तर अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांची उद्योग संचालनालयाचे आयुक्त म्हणून बदली झाली आहे. त्यांची काही महिन्यांपूर्वीच पशू व दुग्धविकास विभागाचे सचिव म्हणून बदली करण्यात आली होती आबासाहेब जराड यांची मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त या पदावर बदली करण्यात आली आहे. 

कोकण विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख हे नुकतेच निवृत्त झाले असून त्यांच्या जागी डॉ. जगदीश पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे. विकास देशमुख यांच्याकडे पशुसंवर्धन दुग्ध विकास विभागाचे सचिव पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर मुंबई महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव पदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे. डॉ. निपुण विनायक यांच्याकडे राज्य लॉटरीचे आयुक्त पद देण्यात आले असून फिल्म सिटीचे व्यवस्थापकीय संचालक पद जयश्री भोज यांच्याकडे सोपविण्यात आले. 

सांगलीचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांची भूजल सर्वेक्षण विकास विभाग पुणे येथे बदली करण्यात आली आहे. राज्य लॉटरी विभागाचे आयुक्त बी. एस कोळसे यांची नियोजन विभागाचे सहसचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. तर फिल्म सिटीचे व्यवस्थापकीय संचालक व्ही. एन कलाम यांची सांगलीचे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.

आदिवासी विकास विभागाचे सहसचिव म्हणून सुनील पाटील यांची तर उल्हासनगरचे महापालिका आयुक्त पदावर आर. व्ही निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मालेगाव महापालिका आयुक्त आर एस जगताप यांची नागपूरचे विभागीय अतिरिक्त आयुक्त या पदावर बदली करण्यात आली आहे. 

गडचिरोलीतील सहायक जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांची अकोला जिल्ह्यात परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली झाली तर पुणे म्हाडा मुख्य अधिकारी म्हणून ए डब्ल्यू काकडे यांची या पदावर नियुक्ती झाली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com