tranfer of ias officer inthe state | Sarkarnama

राज्यात अनेक महत्वाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या...

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 16 जानेवारी 2020

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूर्वीच्या फडणवीस सरकारच्या कार्यकाळात नियुक्‍तीवर असलेल्या ज्येष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या विविध ठिकाणी बदल्या केल्या आहेत. राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर आत्ता अनेक महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. 

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूर्वीच्या फडणवीस सरकारच्या कार्यकाळात नियुक्‍तीवर असलेल्या ज्येष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या विविध ठिकाणी बदल्या केल्या आहेत. राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर आत्ता अनेक महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. 
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकार आल्यावर बदल्यांमध्ये पहिला दणका ब्रिजेश सिंग यांना बसला आहे. माहिती जनसंपर्क महासंचालक या पदावर याआधी कधीही आयपीएस अधिकाऱ्यांना जबाबदारी दिली गेली नव्हती. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी ब्रिजेश सिंग यांना ती जबाबदारी दिली होती. या सरकारने त्यांना मूळ सेवेत परत पाठविले आहे. त्यांच्या जागी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे हे आता पदोन्नतीवर डीजीआयपीआरची जबाबदारी घेणार आहेत. तसेच, प्रवीण दराडे यांची एमएमआरडीएच्या अतिरिक्त आयुक्तपदावरून समाजकल्याण आयुक्‍त या पदावर बदली करण्यात आली आहे. प्रवीण दराडे सुरुवातीला मुख्यमंत्री कार्यालयात सचिव म्हणून कार्यरत होते. फडणवीस यांनी नंतर त्यांची एमएमआरडीएमध्ये बदली केली होती. 

बदल्या खालीलप्रमाणे (कंसात पूर्वीची जबाबदारी) 
- राजीव जलोटा - अपर मुख्य सचिव ग्रामविकास - (आयुक्त विक्रीकर) 
- संजीव कुमार - आयुक्त विक्रीकर महाराष्ट्र राज्य, मुंबई - (अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण) 
- शैला ए. - अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युतनिर्मिती कंपनी, मुंबई - (सहविक्रीकर आयुक्त) 
- पी. वेलरासू - अतिरिक्त महापालिका आयुक्त, बृहन्मुंबई महापालिका- (सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण) 
- असीमकुमार गुप्ता - प्रधान सचिव ऊर्जा - (प्रधान सचिव ग्रामविकास) 
- श्वेता सिंघल - अतिरिक्त विभागीय आयुक्त, पुणे (जिल्हाधिकारी, सातारा) 
- शेखर सिंग- सातारा जिल्हाधिकारी - (जिल्हाधिकारी गडचिरोली) 
- मंजू लक्ष्मी - जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग - (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग) 
- मिलिंद शंभरकर - नियुक्ती जिल्हाधिकारी, सोलापूर (आयुक्त, समाजकल्याण) 
- आर. बी. भोसले - सहव्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, कल्याण (जिल्हाधिकारी, सोलापूर) 
- नयना गुंडे - आयुक्त आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे - (अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पुणे महानगर परिवहन महामंडळ) 
- डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी- अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पुणे महानगर परिवहन महामंडळ, पुणे (जिल्हाधिकारी, रायगड) 
- आर. एस. जगताप - अतिरिक्त विभागीय आयुक्त, नागपूर - (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, भंडारा) 
- भुवनेश्वरी - मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, भंडारा - (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक) 
- मदन नागरगोजे - संचालक माहिती व तंत्रज्ञान मुंबई 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख