A trader pays fine in coins , officers count it for two hours | Sarkarnama

 व्यापाऱ्याने दंडापोटी पाच हजारांची नाणी दिली; मोजायला लागले दोन तास 

सरकारनामा
मंगळवार, 29 जानेवारी 2019

एपीएमसी मार्केट मध्ये  दुकानदाराने चक्क पाच हजार रुपयांची नाणी दंडापोटी भरले. ही रक्कम घेतल्यांनतर दोन तास नाणी मोजण्यामध्ये वेळ गेला.
- निलेश पाटील, प्रदुषण निंयत्रण मंडळ क्षेत्र अधिकारी 

वाशी:  मंकरद अनासपुरेचा गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा या सिनेमाची आठवण करून देणारा प्रकार वाशी येथील एपीएमसी बाजारात घडला. 

बेकायदा प्लास्टिक वापरणाऱ्या सात व्यापाऱ्यांवर प्रदुषण नियंत्रण मंडळाने कारवाई करून 35 हजाराचा दंड वसूल केला. मात्र केली. या कारवाईत त्याला पाच हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. 

मात्र व्यापाऱ्याने ही दंडाची रक्कम चक्क एक रुपया, दोन रुपये व पाच रुपयांची पाच हजार रुपयांची नाणी देऊन भरला. ही रक्कम मोजण्यास अधिकाऱ्यांना दोन तास लागल्यामुळे अधिकाऱ्यांना डोकेदुखी झाली.

बंदी घातलेल्या प्लास्टिक वस्तू विक्रीसाठी ठेवणाऱ्यांवर प्रदूषण नियंत्रण मंडळांने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली. 23 व 24 जानेवारी रोजी व्यापाऱ्यावर करण्यात आलेल्या कारवाईत 1500 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. 

या व्यापाऱ्याकडून 35 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मात्र या कारवाईदरम्यान एपीएमसी मार्केटमधील रॉयल मसाला व ड्रायफ्रूट या दुकानात प्लास्टिक आढळल्यांनतर त्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला.

ही कारवाई प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी अनंत हर्षवर्धन यांच्या मार्गदर्शनाखली करण्यात आली. या वेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उल्हास कानडे व नीलेश पाटील हे क्षेत्र अधिकारी उपस्थित होते.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख