पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदासाठी दोन माईंमध्ये लढत 

 पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदासाठी दोन माईंमध्ये लढत 

पिंपरी : अपेक्षेनुसार पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदासाठी भाजपकडून शहराचे कारभारी आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या चिंचवड मतदारसंघातील नगरसेविका उषा ऊर्फ माई ढोरे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांचे नाव या पदासाठी पुढे आल्याचे वृत्त सरकारनामाने आजच दिले होते. 

तसेच महापौर चिंचवडचेच असणार असल्याचेही या वृत्तात म्हटले होते. भाजपच्या माईंविरुद्ध राष्ट्रवादीनेही त्यांच्या स्वाती ऊर्फ माई काटे यांना रिंगणात उतरविले आहे. 

उपमहापौरपदासाठी भाजपने तुषार कामठे या पहिल्यांदाच निवडून आलेल्या पोलिस पुत्र तरुण नगरसेवकाला संधी दिली आहे.राष्ट्रवादीने त्यांच्याविरुद्ध राजू बनसोडे यांना उमेदवारी दिली. पालिकेत भाजपचे बहूमत असल्याने तारखेला होणारी महापौर,उपमहापौर निवडणुकीची औपचारिकता उरली आहे. फक्त यावेळी भाजपचा उमेदवार कमी फरकाने निवडून येणार आहे. कारण शिवसेनेचे नऊ,तर मनसेच्या एका नगरसेवकाचे मत राष्ट्रवादीच्या माईंना महाशिवआघाडीमुळे यावेळी मिळण्याची शक्‍यता आहे. 

सध्याचे महापौरपद हे शहराचे दुसरे कारभारी भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या मतदारसंघात त्यांच्या समर्थक नगरसेवकाकडे होते.त्याअगोदरच महापौर व पक्षाचे पहिले महापौर हे सुद्धा दादांचेच पाठीराखे होते. त्यामुळे यावेळी ही संधी भाऊ गटाकडे जाणे अपेक्षित होते. झालेही तसेच.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com