पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या जर्मनी दौऱ्यावर दोन कोटींचा  खर्च ?

jaykumar_raval
jaykumar_raval

मुंबई  :  पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांचा जर्मनीचा दौरा हा सध्या वायफळ खर्चामुळे चर्चेत आला असून वित्त विभागाची हरकत असताना मुख्यमंत्र्यांच्या परवानगीमुळे या दोऱ्याचा दोन कोटींचा भार सरकारी तिजोरीवर पडल्याचे सूत्रांची माहिती आहे.           

  शेतकऱ्यांची कर्जमाफीमुळे 34 हजार कोटी रुपयांचा बोजा आणि जीएसटी लागू केल्यामुळे  राज्याच्या तिजोरीवर ताण पडलेला आहे. त्यामुळे प्रधान सचिवापासून सर्व अधिकाऱ्यांनी काटकसर करावी अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.  एवढेच नव्हे तर हेलिकॉप्टरचा खर्चिक प्रवास टाळावा असेही जीआरमध्ये नमूद करण्यात आले होते. असे असताना मंत्र्यानी काढलेल्या परदेश दौऱ्याला मात्र अनुमती कशी सवाल सनदी अधिकारी उपस्थित करत आहेत.   जयकुमार रावल यांनी यापूर्वीही  परदेश दौरे केले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या पर्यटनाला गेल्या अडीच वर्षात किती चालना मिळाली याची ही चर्चा होऊ लागली आहे.       

   महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना देण्यासाठी तसेच महाराष्ट्र शासन आणि बडेन वॉटरबर्ग यांच्यामध्ये परस्पर सहकाऱ्यासाठी  सामंजस्य करार करण्यात आला ,या दौऱ्यासाठी एका बहुराष्ट्रीय कंपनीला कंत्राट देण्यात आले होते.                    
 मात्र हा झालेला खर्च हा एकट्या मंत्र्यांच्या दौऱ्यासाठी झालेला खर्च  नसून कलापथक, एमटीडीसीचे अधिकारी अशा सर्वांच्या दौऱ्याच्या खर्चाची ही एकत्रित रक्कम आहे.असे पर्यटन विभागाने खुलासा करण्याचा प्रयत्न केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com