...तर तीन महिन्यांत संपूर्ण कर्जमाफी : अजित पवार

...तर तीन महिन्यांत संपूर्ण कर्जमाफी : अजित पवार

मांडवगण फराटा : भाजप सरकारला शेतकऱ्यांच्या वेदनांची जाणीव नाही. धरणे शंभर टक्के भरलेली असतानादेखील यांना शेतकऱ्यांना पाणी देता आले नाही. या सरकारने आरोग्य, कृषी, ग्रामविकास, पोलिस, शिक्षण या प्रत्येक खात्यात नोकर भरती थांबविल्याने शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी मिळणे कठीण झाले आहे. भाजप अतिशय खालच्या पातळीवरचे नीच पद्धतीचे राजकारण करीत आहे. राज्यात आघाडीची सत्ता आल्यास तीन महिन्यांत संपूर्ण कर्जमाफी करू, असे आश्‍वासन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथे शिरूर मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस महाआघाडीचे उमेदवार अशोक पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. पवार म्हणाले, ""आमची सर्वत्र सत्ता असताना कधीही सत्तेचा माज येऊ दिला नाही. कधीही सूडाचे राजकारण केले नाही. या सरकारच्या काळात शेतकऱ्यांना संप करावा लागला, शेतकऱ्यांना साले म्हणून घ्यावे लागले.''

पक्ष सोडून भाजपमध्ये गेलेल्यांची खिल्ली उडवत अजित पवार म्हणाले, ""एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, दिलीप कांबळे या निष्ठावंतांवर भाजपने जातीपातीचे राजकारण करून वाईट दिवस आणले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भाजपत गेलेल्या जित्राबांचं काही खरं नाही. ते वैयक्तिक स्वार्थासाठी पक्ष सोडून गेलेले आहेत.

या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर भूमकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शशिकांत दसगुडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे, कॉंग्रेसचे कौस्तुभ गुजर, महेश ढमढेरे, राष्ट्रवादी बंजारा सेलचे प्रदेशाध्यक्ष हिरालाल राठोड, घोडगंगा कारखान्याचे माजी उपाध्यक्ष बाबासाहेब फराटे, लतिका जगताप, माणिकराव गोते, जितेंद्र बढेकर, बाळासाहेब ढमढेरे, माऊली काळे यांची भाषणे झाली. या प्रसंगी पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष बाळासाहेब नरके, जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या सभापती सुजाता पवार, डॉ. वर्षा शिवले, शिरूर तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष वैभव यादव, सरपंच शिवाजी कदम, शंकर फराटे, दत्तात्रेय फराटे, मनीषा सोनवणे, प्रतिभा बोत्रे, सुलेखा जगताप उपस्थित होते. सूत्रसंचालन धनंजय फराटे यांनी केले. सरपंच शिवाजी कदम यांनी आभार मानले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com