कॅबिनेट मंत्रिपदासह, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद पटकावत घनसावंगी ठरले पुन्हा शक्तीकेंद्र...

या काळात अध्यक्षपदी अनिरुद्ध खोतकर हे जालना तालुक्‍यातील रेवगाव जिल्हा परिषद गटाचे तर उपाध्यक्ष सतीश टोपे हे अंबड तालुक्‍यातील शहागड जिल्हा परिषद गटाचे तसेच शिक्षण व आरोग्य सभापती रघुनाथ तौर हे अंतरवाली टेभी गटाचे सदस्य होते. घनसावंगी विधानसभा मतदारसंघात जालना व अंबड तालुक्‍याचा काही भाग येतो. जालना तालुक्‍यातील रेवगाव व अंबड तालुक्‍यातील शहागड हे दोन्ही गट घनसावंगी मतदार संघाच्या कार्यक्षेत्रात येतात.
कॅबिनेट मंत्रिपदासह, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद पटकावत घनसावंगी ठरले पुन्हा शक्तीकेंद्र...

घनसावंगी : मंत्रिमंडळात कॅबिनेटपद, जालना जिल्हा परिषदेत उपाध्यक्षपद मिळवत मंत्री राजेश टोपे यांनी पुन्हा एकदा घनसांवगी तालुकाच राजकीय शक्तीकेंद्र असल्याचे दाखवून दिले आहे. राजेश टोपे यांची आरोग्य खात्यांचे कॅबीनेट मंत्री व घनसावंगी जिल्हा परिषद गटातील महेंद्र पवार यांची जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याने घनसावंगीचे शक्तीकेंद्र अढळ असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

मिनी मंत्रालय अशी ओळख असलेल्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 35 विविध योजना ग्रामीण भागाच्या विकासासाठी राबविण्यात येत असल्याने येथील पदाधिकारी निवडीला मोठे महत्व आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती ही पदे ज्या भागातील पदाधिकाऱ्यांकडे असतात त्या भागातील विकासाला चालना सहज मिळते. त्यादृष्टीने मागील काळात जालना जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष व शिक्षण व आरोग्य सभापती पद हे तालुक्‍यात व मतदारसंघातच होते. 

या काळात अध्यक्षपदी अनिरुद्ध खोतकर हे जालना तालुक्‍यातील रेवगाव जिल्हा परिषद गटाचे तर उपाध्यक्ष सतीश टोपे हे अंबड तालुक्‍यातील शहागड जिल्हा परिषद गटाचे तसेच शिक्षण व आरोग्य सभापती रघुनाथ तौर हे अंतरवाली टेभी गटाचे सदस्य होते. घनसावंगी विधानसभा मतदारसंघात जालना व अंबड तालुक्‍याचा काही भाग येतो. जालना तालुक्‍यातील रेवगाव व अंबड तालुक्‍यातील शहागड हे दोन्ही गट घनसावंगी मतदार संघाच्या कार्यक्षेत्रात येतात. 

विशेष म्हणजे अनिरुद्ध खोतकर हे तत्कालीन राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांचे चुलत बंधू असून त्यांचे मूळगाव गाढेसावरगाव हे घनसावंगी तालुक्‍यातच आहे. त्यांची येथे शेती, घर व कुटुबांचे वास्तव्य देखील इथेच असते. राजेश टोपे यांचे चुलत बंधू सतीश टोपे हे याच भागातील असल्याने जिल्हा परिषदेतील दोन्ही महत्वाची पदे या निमित्ताने घनसावंगी तालुक्‍याकडेच होती. अर्जुन खोतकर हे देखील युती सरकारमध्ये राज्यमंत्री होते. यावरून जिल्ह्यातील महत्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांसह राज्यपातळीवरील मोठी मंत्रीपद देखील मिळवण्यात घनसावंगीच्या शक्तीकेंद्राला वारंवार यश आल्याचे दिसून येते. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com