निवडणूक आयोगाकडून जिल्हा परिषद निवडणुकीची चाचपणी

पुढील वर्षी मार्चमध्ये जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्यांची मुदत संपत असल्याने निवडणूक अटळ आहे. त्यादृष्टीने इच्छुकांनी आताच तयारी सुरू केली असून, आता निवडणूक आयोगही तयारीला लागला आहे.
ZP Nashik
ZP Nashik

येवला : पुढील वर्षी मार्चमध्ये जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्यांची मुदत संपत असल्याने (Z. P. elected members term will complete next year) निवडणूक अटळ आहे. त्यादृष्टीने इच्छुकांनी आताच तयारी सुरू केली असून, (Aspirant Candidates start political prepration) आता निवडणूक आयोगही तयारीला लागला आहे. आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी सदस्यसंख्या निश्चितीकरिता ग्रामीण भागातील लोकसंख्या (E.C. call population information) पाठविण्याची मागणी केली आहे.

कोरोनामुळे दोन वर्षांत ग्रामपंचायत वगळता इतर सर्व संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. त्यामुळे कोरोना शांत होताच जिल्हा बँक, नागरी व सहकारी बँका, बाजार समित्या, पालिका, सहकारी सोसायट्यांच्या निवडणुकांची लगीनघाई होणार आहे. त्यातच नाशिक जिल्हा परिषदेची मुदत २० मार्चला, तर जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांची मुदत १३ मार्चला संपत आहे. त्यामुळे मुदत संपण्यापूर्वीच सार्वत्रिक निवडणुका घेणे क्रमप्राप्त आहे. सध्याची लोकसंख्या विचारात घेऊन या स्थानिक स्वराज्य संस्थेची सदस्यसंख्या निश्चित केली जाणार आहे. त्यानुसार २०११ च्या जनगणनेनुसार ग्रामीण भागातील लोकसंख्येची माहिती आयोगाने मागितली आहे. यामध्ये नव्याने स्थापन झालेल्या पालिका, नगरपंचायती तसेच महापालिकेच्या हद्दवाढीच्या क्षेत्राची लोकसंख्या वगळून तालुकानिहाय ग्रामीण लोकसंख्येची माहिती पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रपत्र ‘अ’मध्ये एकूण लोकसंख्या, अनुसूचित जातीची व जमातीची लोकसंख्या तसेच संपूर्णता अनुसूचित क्षेत्र म्हणून घोषित झाल्यास त्याचा तपशील द्यायचा आहे. प्रपत्र ‘ब’मध्ये नव्याने अस्तित्वात असलेल्या महापालिका, पालिका नगरपंचायती व हद्दवाढ याचा तपशील द्यायचा आहे, प्रपत्र ‘क’मध्ये नव्याने पालिका किंवा नगरपंचायत झाल्या असल्यास त्याच्या वगळाव्या लागणाऱ्या लोकसंख्येचा तपशील जिल्हाधिकाऱ्यांनी द्यायचा आहे. त्यानंतर गट-गणाची लोकसंख्या निश्चित होऊन सदस्यसंख्या ठरणार आहे.

सध्याचे बलाबल
सध्या नाशिक जिल्हा परिषदेचे ७३ सदस्य असून, शिवसेनेची सत्ता आहे. पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत जिल्ह्यातून शिवसेनेचे २५, भाजपचे १५, राष्ट्रवादी काँग्रेसचे १६, काँग्रेसचे ८, माकपचे ३ व अपक्ष ५ सदस्य निवडून आले आहेत. त्यानंतर राज्याच्या राजकारणाच्या पुलाखालून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेल्याने या वेळची निवडणूक सत्ताधारी महाआघाडी एकत्रितपणे लढविणार की स्वतंत्रपणे लढविणार, यावरही बरेच काही चित्र अवलंबून आहे. अर्थात जिल्ह्यात अनेक नवोदित व मातब्बर पुन्हा जिल्हा परिषदेच्या तयारीत असून, आतापासूनच गावनिहाय दौरे, भेटीगाठी सुरू केल्या आहेत.
....
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in