जुन्नरमध्ये 12 वर्षांनंतर पुन्हा वाहिले ताशी 100 किमी वेगाने वारे 

जुन्नर तालुक्‍यात सुमारे दोनशे विजेचे पोल पाडून वीज वाहक तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे.वीज वितरण कंपनीने दुरुस्तीची कामे सुरू केली आहेत. कृषी व महसूल विभागाने नुकसानीचे पंचनामे आज सकाळपासून सुरू केले आहेत.
जुन्नरमध्ये 12 वर्षांनंतर पुन्हा वाहिले ताशी 100 किमी वेगाने वारे 
Winds blowing at a speed of 100 kmph in Junnar taluka

नारायणगाव : जुन्नर तालुक्‍यात चार जून 2008 रोजी झालेल्या वादळी वाऱ्याची पुनरावृत्ती बुधवारी (ता. 3) दुपारी पुन्हा झाली. बुधवारी दुपारी चार ते पाच दरम्यान पश्‍चिम दिशेकडून उत्तर दिशेकडे वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग ताशी 90 ते 100 किलोमीटर असल्याची नोंद झाली आहे. 

खोडद येथील दुर्बीण प्रकल्पाच्या (जीएमआरटी) वेदर स्टेशनच्या आलेखावर वाऱ्याचा वेग ताशी 90 ते 100 किलोमीटर असल्याची नोंद झाली आहे. वाऱ्याच्या या वेगामुळे नुकसानीची तीव्रता वाढली आहे, अशी माहिती आमदार अतुल बेनके, जीएमआरटीचे वरिष्ठ अधिकारी जे. के. सोळंकी यांनी आज दिली.

तालुक्‍यात सुमारे दोनशे विजेचे पोल पाडून वीज वाहक तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे.वीज वितरण कंपनीने दुरुस्तीची कामे सुरू केली आहेत. कृषी व महसूल विभागाने नुकसानीचे पंचनामे आज सकाळपासून सुरू केले आहेत. शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे आमदार अतुल बेनके यांनी या वेळी सांगितले. 

जुन्नर तालुक्‍यातील शेतकऱ्यांना या वर्षी सप्टेंबर महिन्यापासून अतिवृष्टी, गारपीट व वादळी वाऱ्याचा फटका बसला आहे. मागील नऊ महिन्यात शेती व्यवसाय पूर्ण अडचणीत सापडला आहे. बुधवारी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे तालुक्‍यातील सर्व फळभाजीपाला पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. जनावरांचे गोठे, शेततळी, पत्रा छत असलेली घरे, व्यावसायिक दुकाने आदींचे मोठे नुकसान झाले आहे. होतातोंडाशी आलेले आंबा, डाळिंब, केळी, टोमॅटो, सीताफळ या फळभाजीपाला पिकांचे भरून न येणारे नुकसान झाले आहे. फळ झाडे उन्मळून पडली आहेत. द्राक्ष वेली तुटल्याने मागील वर्षभरात द्राक्ष उत्पादकांना दुसऱ्यांदा फटका बसला आहे, असे आमदार बेनके म्हणाले. 


....म्हणून टळले "जीएमआरटी'चे कोट्यवधींचे नुकसान 

जुन्नर, आंबेगाव तालुक्‍यात जीएमआरटी प्रकल्पाचे 45 मीटर व्यास असलेले तीस अँटेना आहेत. चक्री वादळी वाऱ्याची व दिशेची पूर्वकल्पना असल्याने निरीक्षणे बंद करून सर्व अँटेना पार्किंग मोडमध्ये ठेवले होते, त्यामुळे दुर्बिण प्रकल्पाचे मोठे नुकसान टळले. मात्र प्रकल्पाच्या आवरात सुमारे 100 वृक्ष पडले आहेत. 

Related Stories

No stories found.