रामदास आठवले म्हणाले, `त्या`मुळे  तत्त्वांशी तडजोड करावी लागते

कोणत्याही राजकीय पक्षाला स्वबळावर सरकार बनविणे अशक्य झाल्यास राज्यात युती व केंद्रात आघाडीचा प्रयोग अपरिहार्य असतो. एका पक्षाला स्पष्ट बहुमत प्राप्त होत नाही, तेव्हा समाजातील गोरगरीब घटकांना न्याय देताना तत्त्वांशी तडजोड करीत राजकीय प्रवाहात राहणे भाग पडते.
रामदास आठवले म्हणाले, `त्या`मुळे  तत्त्वांशी तडजोड करावी लागते
Ramdas Athawale f

सटाणा : कोणत्याही राजकीय पक्षाला स्वबळावर सरकार बनविणे अशक्य झाल्यास (If asingle party doesn`t possible to made government it`s own)  राज्यात युती व केंद्रात आघाडीचा प्रयोग अपरिहार्य असतो. (Then it`s compulsion to make alliance or front in state or in centre)  एका पक्षाला स्पष्ट बहुमत प्राप्त होत नाही, तेव्हा समाजातील गोरगरीब घटकांना न्याय देताना तत्त्वांशी तडजोड करीत राजकीय प्रवाहात राहणे भाग पडते, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी येथे केले. 

येथील पालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह बांधकामाचे भूमिपूजन व हुतात्मा स्मारक नूतनीकरण कामांच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त शुक्रवारी शहरातील दगाजी चित्रमंदिरमध्ये झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. बागलाणचे आमदार दिलीप बोरसे अध्यक्षस्थानी होते. 

आठवले म्हणाले, की केंद्रातील मोदी सरकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखविलेल्या मार्गानुसार देशातील अठरापगड जातींच्या समाजाच्या उत्कर्षासाठी विशेष प्रयत्न करीत आहे. आठवले यांनी आपल्या विशेष शैलीत नगराध्यक्ष मोरे यांनी केलेल्या विकासकामांविषयी वेगवेगळ्या कविता सादर करून आपल्या खासदार निधीतून सटाणा शहराच्या विविध विकासकामांसाठी भरीव आर्थिक निधी उपलब्ध करून देणार असल्याचे जाहीर केले. 

आमदार बोरसे म्हणाले, की अल्पावधीतच सटाणा शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे काम नगराध्यक्ष मोरे यांनी केले आहे. विकासासाठी त्यांच्या पाठीमागे शहरवासीयांनी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहनही त्यांनी केले. रिपाइंचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांनी मनोगत व्यक्त केले. 

नगराध्यक्ष मोरे यांनी शहरात सुरू असलेल्या विकासकामांची माहिती दिली. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या सभागृहासाठी ७८ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याचे स्पष्ट करीत शहरात बौद्ध विहार निर्मितीसाठी प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट केले. या वेळी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष उत्तम भामरे, शाहीर भीमराव पवार यांचा आठवले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

कार्यक्रमास उपनगराध्यक्ष दीपक पाकळे, शंकर सावंत, गटनेते महेश देवरे, नितीन सोनवणे, राकेश खैरनार, दिनकर सोनवणे, संगीता देवरे, राहुल पाटील, शमा मन्सुरी, उपसभापती सुवर्णा नंदाळे, नगरसेविका सुरेखा बच्छाव, बाळू बागूल, सुनीता मोरकर, भारती सूर्यवंशी, शमीम मुल्ला, आशा भामरे, दत्तू बैताडे, शफीक मुल्ला, नाना मोरकर, हेमंत पाटील, दीपक सोनवणे, माजी नगरसेवक मनोज वाघ, दोधा मोरे, आरिफ मन्सुरी, रिपाइंचे दिलीप सोनवणे, किशोर सोनवणे, मुख्याधिकारी हेमलता डगळे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते, विभागप्रमुख, कर्मचारी उपस्थित होते. राजेंद्र पवार यांनी सूत्रसंचालन केले. महेश देवरे यांनी आभार मानले.  
...
हेही वाचा...

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in