राजीव सातव यांच्या जागेवर देवरा, पांडे की वासनिक?    

प्रज्ञा सातव यांना राज्यसभेवर पाठवावे की विधानसभेची उमेदवारी द्यावी, याविषयी वरिष्ठ पातळीवर अद्याप चर्चा सुरु आहे.
राजीव सातव यांच्या जागेवर देवरा, पांडे की वासनिक?    
Rajiv Satav, Mukul Wasnik, Avinash Pandey, Milind Deora, .jpg

पुणे : राज्यसभेसाठी होणाऱ्या निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी सध्या काँग्रेस नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव (Rajiv Satav) यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली आहे. या जागेवर सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव सर्वाधिक प्रबळ उमेदवार मानल्या जात आहेत. मात्र, आता या जागेसाठी काँग्रेसच्या बड्या नेत्यांकडून लॉबिंग सुरु असल्याने प्रज्ञा सातव (Pragya Satav) यांच्या नावावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. (Who will get the opportunity to replace Rajiv Satav) 

राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकूल वासनिक आणि माजी खासदार अविनाश पांडे इच्छूक असल्याचे सांगितले जात आहे. तर मुंबईतील काँग्रसचे नेते मिलिंद देवरा आणि संजय निरुपम यांच्याकडूनही उमेदवारीसाठी लॉबिंग केले जात असल्याचे समजते. त्यामुळे काँग्रेस आता कोणाला उमेदवारी देणार यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. 

प्रज्ञा सातव यांना राज्यसभेवर पाठवावे की विधानसभेची उमेदवारी द्यावी, याविषयी वरिष्ठ पातळीवर अद्याप चर्चा सुरु आहे. राजीव सातव यांच्या निधनानंतर  काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा सुरु आहे. मात्र, त्याऐवजी त्यांना 2024 च्या विधानसभा निवडणुकीत कळमनुरी मतदारसंघातून उमेदवारी द्यावी, असेही काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवर बोलले जात आहे. त्यामुळे आता काँग्रेसच्या निर्णयाकडे नजरा लागल्या आहेत.

निवडणूक आयोगाने गुरुवारी राज्यसभेच्या 6 रिक्त जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. महाराष्ट्र, तामिळना़डू, पश्चिम बंगाल, आसाम आणि मध्य प्रदेशातील जागांवर ही निवडणूक होत आहे. निवडणुकीची अधिसूचना 15 सप्टेंबरला जारी होणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 सप्टेंबर आहे. तर 4 ऑक्टोबरला मतदान होऊन त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे.

काँग्रेसने राजीव सातव यांना राज्यसभेवर पाठवले होते. राजीव सातव यांना कोरोनासंसर्ग झाल्याने 16 मे रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे राज्यसभेची जागा रिक्त झाली आहे. महाराष्ट्रातून राजीव सातव यांच्या जागी कुणाला संधी मिळणार यावर चर्चा होत आहे. प्रज्ञा सातव यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या उपाध्यक्षा म्हणून निवड केली आहे. त्यामुळे त्यांना विधानसभेला संधी मिळेल अशी चर्चा सुरु आहे.  

Edited By - Amol Jaybhaye 

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.